प्राप्तिकर विवरणपत्रासाठी नवीन तीन पानी आयटीआर फॉर्म देण्यात आला असून, परदेशी प्रवासाचा खर्च व बंद बँक खात्याची माहिती देणे या दोन प्रस्तावित अटी वगळण्यात आल्या आहेत. तसेच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र करदात्यांनी पारपत्र क्रमांक व बँकेच्या चालू असलेल्या खात्याचा तपशील देणे आवश्यक आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
मुख्य आयटीआर फॉर्ममध्ये तीन पाने आहेत व इतर माहिती परिशिष्टात द्यायची आहे. तसेच ती लागू असेल तरच भरायची आहे. आयटीआर फॉर्म आधी १४ पानांचा होता. त्यामुळे करदाते, उद्योगपती व खासदारांनी तो भरणे अवघड असल्याचे म्हटले होते. त्याची दखल घेऊन हे फॉर्म मागे घेण्याचे आदेश अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले होते. नवीन फॉर्मसाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू असल्याने विवरणपत्रे दाखल करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नवीन फॉर्म ई-फायलिंगसाठी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात उपलब्ध होणार आहे. व्यक्तिगत करदात्यांसाठी व एकत्र हिंदू कुटुंबांसाठी आयटीआर-२-ए विवरणपत्र तयार करण्यात आले आहे. ज्यांचे भांडवली उत्पन्न नाही, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न नाही त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. तीन वर्षांपासून बंद असलेल्या बँक खात्यांचा तपशील आता द्यावा लागणार नाही. परंतु वापरात असलेल्या खात्यांचा क्रमांक व आयएफएस क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यात किती पैसे आहेत हे सांगावे लागणार नाही. जे भारतीय नागरिक नाहीत पण उद्योगासाठी, रोजगारासाठी किंवा विद्यार्थी व्हिसावर भारतात आहेत, त्यांना अगोदरच्या वर्षांत परदेशात मिळवलेल्या मालमत्तेचा तपशील देण्याची सक्ती नाही.
प्राप्तिकरदात्यांसाठी..
*नवीन तीन पानी आयटीआर फॉर्म जारी. व्यक्तिगत करदात्यांसाठी आयटीआर २ ए फॉर्म
*ऑनलाइन जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात येणार. विवरणपत्रास
३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.
*बंद खात्यांचा तपशील आवश्यक नाही. परदेश दौऱ्याचा खर्च सांगणे आवश्यक नाही.
प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ
प्राप्तिकर विवरणपत्रासाठी नवीन तीन पानी आयटीआर फॉर्म देण्यात आला असून, परदेशी प्रवासाचा खर्च व बंद बँक खात्याची माहिती देणे या दोन प्रस्तावित अटी वगळण्यात आल्या आहेत.
First published on: 01-06-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax forms simplified date for filing returns extended to aug