इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एका अत्तर व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली असता हाती घबाड लागलं आहे. कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्यासी संबंधित मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल १५० कोटींची रोख रक्कम लागली आहे.

इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून यामध्ये नोटांचे ढीग दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचं दिसत आहे. हे पैसे प्लास्टिक पिशवीत ठेवत त्यावर चिकटपट्टी लावून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अधिकारी खाली बसून पैसे मोजताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर नोटांचा ढीग लागला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

एकूण किती रक्कम सापडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. अधिकारी अद्यापही पैशांची मोजणी करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी ही धाड टाकण्यात आली असून कारवाई अद्यापही सुरु आहे. कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरु आहे. करचोरी केल्याप्रकरणी जीएसटीकडून ही कारवाई करण्यात आली. यानंतर आयकर विभागही कारवाईत सहभागी झालं.

खोटी बिलं बनवून हे सर्व पैसे गोळा करण्यात आले होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बनावट कंपन्यांच्या नावे ही बिलं तयार करण्यात आली होती. एक बिल ५० हजारांचं असून अशी २०० हून अधिक बिलं जीएसटी पेमेंटविना तयार करण्यात आली होती. चार ट्रकमध्ये ही बिलं सापडली असून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.

अखिलेश यादव याचं कनेक्शन काय?

कारवाई करण्यात आलेले पियूष जैन हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अखिलेश यादव यांनीच त्यांच्या अत्तराचं लाँचिंग केलं होतं. यावरुन भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

हाच समाजवादी पक्षाचा खरा रंग आहे असं ट्विट उत्तर प्रदेश भाजपाने केलं आहे. समजवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांनी केली आहे.