पीटीआय, नवी दिल्ली

सरकारी तेल कंपन्यांनी ‘एलपीजी’ (लिक्विड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या दरांत बुधवारी मोठी वाढ केली. घरगुती वापराच्या १४ किलो सिलेंडरमध्ये ५० रुपये तर व्यावसायिक वापराच्या १९ किलो क्षमतेच्या सिलेंडर दरात ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली. ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकीचे मतदान होताच झालेल्या या भाववाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
Petrol Diesel Price Changes On 9 December
Latest Petrol Price Updates : महाराष्ट्रात इंधन वाढ सुरूच! तुमच्या शहरांतील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
Maruti Suzuki to increase car prices from Jan 2024
नवीन वर्षात वाहने महागणार! मारुती सुझुकीसह बहुताशांकडून किंमतीत वाढ

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये सोमवारी मतदान झाले. उद्या, गुरुवारी मतमोजणी होण्यापूर्वीच सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूुस्थान पेट्रोलियम यांनी गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केली. जवळजवळ आठ महिन्यांनी झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी १,१०२.५० रुपये मोजावे लागतील. उज्ज्वला योजनेत समावेश नसलेल्या बहुतांश वापरकर्त्यांना गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेमध्ये सिलिंडरमागे २०० रुपये सरकार भरत असल्यामुळे या योजनेतील वापरकर्त्यांना मुंबईत (पान ४ वर) (पान १ वरून) ९०२.५० रुपये द्यावे लागतील. स्थानिक करांमुळे सर्व राज्यांमध्ये सिलिंडरचे दर वेगवेगळे असतात.

या दरवाढीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. ‘मोदी सरकारच्या काळात झालेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे,’ असे ट्विट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘मोदी सरकारने जनतेला दिलेली ही होळीची भेट आहे,’ असा टोला लगावला.

यापूर्वी घरगुती सिलिंडरचे दर ४ जुलै २०२२ रोजी वाढविण्यात आले होते. वास्तविक कंपन्यांनी दर महिन्याला उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दरांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांमध्ये असा आढावा घेण्यात आला नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने जून २०२० ते जुन २०२२ या काळात कंपन्यांना झालेल्या नुकसानीपोटी २२ हजार कोटींची अर्थसहाय्य देऊ केले होते. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये जानेवारी महिन्यात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचे (एटीएफ) दर चार टक्क्यांनी घटविण्यात आले आहेत. दर महिन्याच्या एक तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि रुपयाच्या विनिमय दराच्या आधारे एटीएफचे दर निश्चित केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे एटीएफ प्रति किलोलिटर ४,६०६.५० रुपयांनी घटले आहे.

खाद्यपदार्थ महागणार?
वडापावाच्या गाडय़ांपासून ते हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल ३५० रुपयांनी वाढल्यामुळे याचा फटका संबंधित व्यावसायिकांना बसणार आहे. या दरवाढीमुळे आगामी काळात बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढ नाही
कंपन्यांनी गेल्या १५ दिवसांमधील उत्पादन खर्च आणि दराचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. मात्र एप्रिल २०२२नंतर कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या काळात युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार झाली आहे. २२ मे २०२२ रोजी सरकारने सीमाशुल्कामध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दोन्ही इंधनांचे दर स्थीर आहेत.

लोक विचारत आहेत – आता होळीचे पदार्थ कसे बनवायचे? किती काळ ही लूट सुरू राहणार आहे? मोदी सरकारने लादलेल्या या कंबर मोडणाऱ्या महागाईची प्रत्येकालाच झळ बसते आहे. – मल्लिकार्जून खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

Story img Loader