Independence Day 2022, 75th Independence Day : आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे.

Live Updates

Independence Day 2022 Live Updates 75th Independence Day : अमृतमहत्सवी स्वातंत्र्यदिनाची प्रत्येक लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

09:08 (IST) 15 Aug 2022
घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान- नरेंद्र मोदी

घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. घराणेशाही नष्ट करायला हवी.

09:02 (IST) 15 Aug 2022
भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यावी लागेल- नरेंद्र मोदी

भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यावी लागणार आहे. मी आज जनतेने साथ द्यावी असे आवाहन करतो. भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकाचे जगणे गठीण झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठीण धोरण आखले जात नाही.

09:00 (IST) 15 Aug 2022
भ्रष्टाचार आणि भाई-भतीचाविरोधात लढावे लागेल- नरेंद्र मोदी

भारतात देश गरिबिशी झगडत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी लेलेला माल लवपण्यासाठी जागा नाही. आपल्याला भ्रष्टाचार आणि भाई-भतीचाविरोधात लढावे लागेल.

08:57 (IST) 15 Aug 2022
नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात ध्वजारोहण

नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते हे ध्वजारोहण पार पडले.

08:53 (IST) 15 Aug 2022
आपल्याला पूर्ण क्षमतेने भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागेल- नरेंद्र मोदी

आपल्याला पूर्ण क्षमतेने भ्रष्टाचाराविरोधात लढावे लागेल- नरेंद्र मोदी

08:51 (IST) 15 Aug 2022
एकनाथ शिंदे यांनी दिल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुभेच्छा

08:44 (IST) 15 Aug 2022
मी सैनिकांना सलाम करतो- नरेंद्र मोदी

सेनेचा जवान मृत्यू हातात घेऊन चालतो. सेनेने ३०० अशा गोष्टींची यादी करावी ज्या विदेशातून आणायच्या नाहीत. मी देशाच्या सैनिकाला सलाम करतो. मी छोट्या मुलांनादेखील सलाम करतो. आम्ही विदेशी खेळण्याने खेळणार नाहीत, असे ते म्हणतात. ही मुलं असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या रक्तात आत्मनिर्भर भारताची संकल्पना धावत असते.

08:39 (IST) 15 Aug 2022
आपल्याला आपली कर्तव्येही पार पाडावी लागतील- नरेंद्र मोदी

आपल्याला आपली कर्तव्येही पार पाडावी लागतील. उर्जा पुरवण्याचे सराकारचे काम आहे. पण वीज वाचवण्याचे नागरिकांचे कर्तव्य आहे. केमिकल मुक्त शेती, नैसर्गिक शेती हे आपले कर्तव्य आहे. पोलीस, शासक, प्रशासक असो प्रत्येकानेच आपले कर्तव्य पार पाडावे लागेल.

08:37 (IST) 15 Aug 2022
महिलांचा अपमान न करण्याचा संकल्प करूया- नरेंद्र मोदी

एकता आणि एकजुटतेचा विषयही खूप महत्त्वाचा आहे. कोण उच्च कोणी नीच नाही हा भाव एकतेसाठी खूप महत्त्वाचा आहे. मुल आणि मुलगी समान मानले नाही तर एकता प्रत्यक्षात येऊ शकत नाही. 'भारत प्रथम' हा निकष ठेवला तर एकता पुर्णत्वास येईल. आपण अनेक मार्गांनी महिलांचा अपमान करतो. महिलांचा अपमान न करण्याचा संकल्प घेऊ शकतो का. महिलांचा गौरव राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

08:32 (IST) 15 Aug 2022
आपण जगाला 'वसुधैव कुटुंबकम्'चा मंत्र दिला- नरेंद्र मोदी

आपल्याला आपल्या वारशावर गर्व असायला हवा. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ तेव्हाच गगनभरारी घेऊ शकू. आपल्या वारशामुळे आज जग प्रभावित होत आहे. आपण निसर्गावर प्रेम करणारे आहोत. ग्लोबल वार्मिंगचे समाधान आपल्याकडे आहे. सामाजिक, वैयक्तिक तणावाचा विषय निघतो तेव्हा आपल्या कौटुंबिक व्यवस्थेकडे आस्थेने पाहिले जाते. आपण नदीला आई मानतो. आपण नरला नारायण म्हणतो. झाडामध्ये देव पाहतो. आपण वसुधैव कुटुंबकमचा मंत्र जगाला दिला आहे.

08:26 (IST) 15 Aug 2022
आपण जगाच्या सर्टिफिकेटवर किती दिवस जगायचे- नरेंद्र मोदी

आज लाखो कुटुंबाच्या घरी पाणी, वीज पोहोचवण्याचे काम केले जात आहे. आपण सर्वांनी एकदा संकल्प केला तर तो पूर्ण होतो. येणारे २५ वर्षे मोठ्या संकल्पाचे आहेत. हाच आपला प्राण आणि प्रण हवा. आपण जगाच्या सर्टिफिकेटवर किती दिवस जगायचे. आपण आपले मानकं तयार करू शकत नाही. आपल्याला दुसऱ्यांसारखे दिसायची गरज नाही. आपण सामर्थ्याने उभे राहू. आपल्याला गुलामीपासून मुक्ती हवी आहे. आपल्यामध्ये गुलामीचे एक तत्वदेखील नसावे.

08:22 (IST) 15 Aug 2022
युवकांनी देशाला विकसित बनवण्याची शपथ घ्यावी- नरेंद्र मोदी

स्वप्नं जेव्हा मोठी असतात, संकल्प मोठे असतात तेव्हा शक्तीदेखील मोठी असते. स्वातंत्र्याचा संकल्प मोठा होता. हा संकल्प मोठा असला तरी तो पूर्ण केला गेला. आगामी २५ वर्षात आपल्याला भारताला विकसित करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे होतील तेव्हा आजचे युवक ५० ते ५५ वर्षांचे होतील. तुमचे हे वय देशाला विकसित करण्याचे वय आहे. युवकांनो तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जा. हा देश विकसित होईल, यासाठी काम करा. भारत जेव्हा मोठी स्वप्नं पाहतो, ते करुनदेखील दाखवतो.

08:18 (IST) 15 Aug 2022
आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पाहावे लागेल- नरेंद्र मोदी

आता आपण मोठे संकल्प घेऊनच पुढे जाऊयात. आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पाहावे लागेल. आपल्या मनात गुलामीचा अंश असेल तर त्याला बाहेर काढायचे आहे. आपल्याला थोडीजरी गुलामी दिसत असेल तर आपल्याला या गुलामीपासून मुक्ती मिळवावी लागेल. हा दुसरा प्रण आहे. आपल्याला आपल्या वारशाविषयी अभिमान हवा. या वारशाप्रती आपल्याला गर्व असायला हवा. हा दुसरा प्रण आहे. चौथा प्रण एकता हा आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतासाठी एकता महत्त्वाची आहे. नागरिकांचे कर्तव्य हा पाचवा प्राण आहे. नागरिकांच्या कर्तव्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश होतो.

08:13 (IST) 15 Aug 2022
देशासाठी पुढील २५ वर्षे खूप महत्त्वाची आहेत- नरेंद्र मोदी

आपण स्वत:चीच प्रशंसा करत असू तर आपले स्वप्नं दूर निघून जातील. त्यामुळे ७५ वर्षांचा कालखंड कितीजरी कठीण, चांगला असला तरी पुढील २५ वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. याच कारणामुळे १३० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. येणाऱ्या २५ वर्षांसाठी पंचप्रण यावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल.

08:09 (IST) 15 Aug 2022
देश पूर्ण शक्तीने पुढे जात आहे- नरेंद्र मोदी

१३० कोटी जनतेने अनेक वर्षांनी स्थिर सरकारचे काय महत्त्व आहे, राजकीय स्थिरतेचे महत्त्व काय असते, योजनेमध्ये काय सामर्थ्य असते, जगभरात कसा विश्वास निर्माण होतो हे जगाला समजले आहे. निर्णयात गतीशिलता, सर्वव्यापकता, सर्वसमावेशकता असेल तर विकासात प्रत्येकजण सहभाग घेतो. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जगाने पाहिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७५ सरोवर बनवण्याचे काम सुरु आहे. पाणि संवर्धनासाठी मोठे अभियान राबवले जात आहे. गरिबांचे कल्याण, स्वच्छतेचे अभियान असो देश पूर्ण शक्तीने पुढे जात आहे.

08:05 (IST) 15 Aug 2022
भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला- नरेंद्र मोदी

भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. विश्व भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय. प्रत्येक समस्येचं समाधान शोधण्यासाठी जग आपल्याकडे पाहत आहे. जगाच्या विचारांमधील हा बदल आपल्या ७५ वर्षांच्या यात्रेचा परिणाम आहे. आज जग अपेक्षा घेऊन जगत आहे.

08:03 (IST) 15 Aug 2022
'हर घर तिरंगा'च्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली- नरेंद्र मोदी

व्यक्त होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आपल्याकडे चांगली संधी आहे. भारतीय जनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे. थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी करोना वॉरियर्सना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाली. जेव्हा जग करोना काळात लस घ्यावी की नाही या मानसिकतेत होते तेव्हा भारताने जगाला २०० कोटी लसीचे डोस दिले.

07:56 (IST) 15 Aug 2022
माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला- नरेंद्र मोदी

भारत देश हा लोकशाहीची मातृभूमी आहे. आमच्याकडे अनमोल सामर्थ्य असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. २०१४ साली देशाने मला संधी दिला. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेला मी पहिला पंतप्रधान आहे. मी माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला. दलित, दिव्यांग, महिला, शेतकरी, आदिवासी यांना समर्थ बनवण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केलं. भारताच्या लोकांमध्ये आकांक्षा आहेत. आज भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, वर्गात आकाक्षा फुलू लागल्या आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक बदलायला पाहतोय.

07:50 (IST) 15 Aug 2022
भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती- नरेंद्र मोदी

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील. भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे. आपण अन्नाचे संकट झेलले. कधी युद्धाची शिकार झालो. दहशतवादाचे संकट आले. अनेक लोकांचा मृत्यू झाला. नैसर्गिक संकटं आली आहेत. अशी अनेक संकटं आली आहेत. मात्र भारत देश पुढे चालला आहे. भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती आहे.

07:48 (IST) 15 Aug 2022
आदिवासी बांधवांनी मातृभूमीसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली- नरेंद्र मोदी

तिरंगा, मातृभूमीसाठी अनेकांनी मोठी यातना सहन केली. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. या निमित्ताने देशाचे जवान, पोलीस, लोकप्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे

07:43 (IST) 15 Aug 2022
आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली- नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलताना आपण जंगलातील आदिवासी बांधवांचे स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनून अनेक आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यढ्याचे अनेक अंग आहेत.

07:39 (IST) 15 Aug 2022
स्वातंत्र्यसैनिकांना नमन करण्याचा आजचा दिवस- नरेंद्र मोदी

मी जगभरातील भारतीयांना भारताप्रती प्रेम असणाऱ्या सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यांची लढाई ही संघर्षमय राहिली आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला नमन करण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे सकल्प पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे.

07:35 (IST) 15 Aug 2022
लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी

राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.

07:33 (IST) 15 Aug 2022

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

07:27 (IST) 15 Aug 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत. काही क्षणात ध्वजारोहण होणार असून ते देशाला संबोधित करणार आहे. याआधी त्यांना भारतीय संरक्षण दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

07:24 (IST) 15 Aug 2022
नरेंद्र मोदींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

07:22 (IST) 15 Aug 2022
काही क्षणात नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काही क्षणातच ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री तसेच अन्य मान्यवर लाल किल्ल्यावर उपस्थित झाले आहेत.

Independence Day 2022 Live Updates in Marathi

स्वातंत्र्य दिन २०२२ लाइव्ह

Story img Loader