संसद आणि विधिमंडळांचे कामकाज आज ज्या प्रकारे सुरू आहे ते चिंताजनक आहे. भ्रष्टाचाराचे आव्हान आज सर्वात मोठे आहे. प्रशासन आणि लोकशाहीची धुरा वाहाणाऱ्या संस्थांबाबत वाढती नाराजी आहे. यावर मात करण्यासाठी आणि स्थिर सरकार निवडण्याची संधी साधली पाहिजे, असे निखळ राजकीय भाष्य राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देशाच्या ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केले.
आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले की, देशाची सुरक्षितता आणि आर्थिक विकास यांची हमी देऊ शकेल असे स्थिर सरकार लोकांनी निवडले पाहिजे. प्रत्येक निवडणूक ही व्यापक सामाजिक सौहार्द, शांती आणि समृद्धीच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. रॉबर्ट वढेरा प्रकरणावरून भाजपने लोकसभा आणि राज्यसभेत रणकंदन माजविले आहे. घोटाळ्यांच्या आरोपांवरून संसदेचे कामकाज विरोधकांनी रोखण्याचा प्रसंग सातत्याने उद्भवला आहे. त्याबाबत सूचक नाराजी नोंदवताना मुखर्जी यांनी, संसद आणि विधिमंडळांचे कामकाज चिंताजनक पद्धतीने सुरू असल्याचे मत नोंदवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा