अमेरिकेतील नागरिकांसाठी भारत हा सहाव्या क्रमांकावरील महत्त्वाचा म्हणजेच आवडता देश असल्याची आणि पाकिस्तान नावडता देश असल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘गॅलप’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. सद्यस्थितीत अमेरिकेतील दहापैकी आठ लोकांना पाकिस्तान अजिबात आवडत नसल्याचा निष्कर्षही या सर्वेक्षणातून पुढे आला आहे.
सर्वेक्षणातील दहा जणांपैकी सात जणांनी भारत हा अमेरिकेसाठी महत्त्वाच्या देश असल्याचा मत मांडले आहे. एकूण सर्वेक्षणात हे प्रमाण ६८ टक्के आहे. याच क्रमवारीत कॅनडा पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच सर्वाधिक अमेरिकी नागरिकांना कॅनडा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा देश असल्याचे वाटते. त्यानंतर इंग्लंड, जर्मनी, जपान, फ्रान्स यांचा क्रमांक लागतो.
सर्वाधिक अमेरिकी नागरिकांना कोरिया अजिबात आवडत नाही. त्यानंतर इराण आणि पाकिस्तानचा नंबर लागतो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्या अमेरिकी लोकांना रशिया त्यांच्यासाठी महत्त्वाचा देश वाटतो, तर निम्म्या जणांना तो आवडत नाही. एकूण ५२ टक्के नागरिकांनी चीन हा त्यांच्यासाठी नावडता देश असल्याचे म्हटले आहे.