पीटीआय, बंगळूरु

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे चंद्रयान-३ हे अंतराळ यान चंद्राचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडले असतानाच आता भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सूर्ययान मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य-एल १’ हे सूर्ययान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात आणून ठेवण्यात आले आहे. लवकरच हे यान अंतराळात झेपावणार आहे. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे.
बंगळूरुतील यू. आर. राव उपग्रह केंद्रामध्ये हे यान तयार करण्यात आले आहे. बहुधा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे, अशी शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वर्तविली.

‘आदित्य-एल १’ हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान प्रभामंडळ कक्षेत (हॅलो ऑर्बिट) लॅगरेंज पॉइंट-१ येथून सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे अंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. लॅगरेंज पॉइंट-१ येथून कोणत्याही अडथळा आणि ग्रहणाशिवाय सूर्याचे सातत्याने निरीक्षण करणे शक्य होणार आहे.

यामुळे सौर क्रियाकलापांचे निरीक्षण करण्याचा आणि अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे, इसे इस्रोने नमूद केले.

सात पेलोड

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या अंतराळ यानामध्ये सात पेलोड आहेत. सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या एल-१ या कक्षेतून चार पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करणार आहेत. आणि उर्वरित तीन पेलोड एन-१ वर फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India aditya l 1 will soon leap towards the sun amy
Show comments