नवी दिल्ली : अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष सतर्क झाले आहेत. मतमोजणी केंद्र तसेच केंद्रांबाहेर यंत्रणांवर योग्य दबाव राहील याची दक्षता घेतली जाणार आहे. याबाबत रणनीती ठरविण्यासाठी १ जून रोजी दिल्लीत ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. विरोधकांची रणनीती यशस्वी करण्यासाठी देशभरातील नागरी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत.

मतमोजणी सुरू होताना, प्रक्रिया सुरू असताना आणि निकाल जाहीर होताना अशा तिन्ही टप्प्यांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ‘इंडिया’तील घटक पक्षांकडून सक्षम निवडणूक प्रतिनिधी नियुक्त केला जाईल. या प्रतिनिधीला निवडणूक यंत्रासंदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती असेल. अधिकाऱ्यांकडून योग्य रीतीने मतमोजणी होत असल्याची शहानिशा केली जाईल. निवडणूक यंत्रांवरील सील व अन्य तांत्रिक बाबी तपासल्या जातील. मतमोजणीमध्ये गैरप्रकाराची शंका आल्यास आक्षेप नोंदवून अंतिम निकालपत्रावर स्वाक्षरी न करण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे. तीन-चार फेऱ्यांनंतर भाजप उमेदवाराने मताधिक्य घेतले तरीही शेवटपर्यंत देखरेख ठेवण्याची सूचना प्रतिनिधीला केली जाईल. या तांत्रिक पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये सखोल चर्चा होणार असल्याचे समजते. बैठकीला काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव तसेच द्रमुक, भाकप-माकप, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चा आदी सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीच्या प्रक्रियेकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या वेळी एकेका जागेसाठी लढत असल्याने मतमोजणीवेळी कोणताही पक्षपात, भेदभाव होऊ नये यासाठी विरोधक दक्ष असल्याचे ‘इंडिया’तील नेत्याने स्पष्ट केले.

who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
MPs scuffle outside Parliament Case filed against Rahul Gandhi
संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा
महाराष्ट्र आता थांबणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
congress
मुंबईत भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेसचं कार्यालय फोडलं, शाई अन् दगडफेक; पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न!
Amitesh Kumar, Pub Culture Pune, Pune Police Commissioner , Coffee with CP , Pune, loksatta news,
पुणे : विरोध ‘पब’ला नाही; गैरप्रकारांना, पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन, पबसाठी नियमावली आवश्यकच
Pimpri illegal Bangladesh citizens, Police action Bangladesh citizens, Pimpri, illegal Bangladesh citizens,
पिंपरी : अवैध बांगलादेशींविरुद्ध पोलिसांचा बडगा; ‘वाचा’ आतापर्यंत किती जणांवर केली कारवाई?

हेही वाचा >>> २०६ प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरू; कसे असतील पुढचे ४५ तास?

अखेरचे मत मोजेपर्यंत थांबा

अनेकदा पाच हजारांचे मताधिक्य बघून निवडणूक अधिकारी स्वत:हून उमेदवाराच्या विजयाची घोषणा करतो. त्याने अंतिम निकालपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर न्यायालयात आव्हान देण्यापलीकडे विरोधी उमेदवारांना काहीही करता येत नाही. ही हतबलता टाळण्यासाठी अखेरचे मत मोजले जाईपर्यंत निकाल जाहीर करू देऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना ‘आप’चे नेते व नवी दिल्ली मतदारसंघातील उमेदवार सोमनाथ भारती यांनी नागरी संघटनांच्या दिल्लीतील बैठकीमध्ये केली. जवाहर भवनमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये ‘सप’चे नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनीलम, अर्थतज्ज्ञ प्रभाकर परकला, विजय प्रताप, तिस्ता सेटलवाड, महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमचे मुजीब आदी अनेक नागरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गनती की चौकीदारी

मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते ‘गनती की चौकीदारी’ करतील, असा निर्णय नागरी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ही रणनीती यशस्वी झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत केली जाणार आहे. २२५-२५० मतदारसंघांमध्ये नागरी संघटनांचे कार्यकर्ते ‘इंडिया’तील पक्षांना मदत करतील. मतदान केंद्रावरील पक्षाच्या प्रतिनिधींवर कोणताही दबाव येऊ नये यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहून कायद्यानुसार वागण्यास बाध्य केले जाईल.

मतमोजणीतील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी जनतेचा दबाव बनवण्याची गरज आहे. ‘इंडिया’तील पक्षांनी नागरी संघटनांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. – विजय प्रताप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Story img Loader