नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ‘दिल्लीचे पॅरिस करण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले होते पण, दिल्लीची काय दुरवस्था केली हे बघा’, असे म्हणत राहुल गांधींनी मंगळवारी ‘आप’ सरकारविरोधात चित्रफीत प्रसारित केली. या चित्रफितीमध्ये शहरात ठिकठिकाणी पडलेला कचरा, नाल्यांची-रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यात आली आहे. नागरी सुविधांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. उत्तर-पूर्वेतील सीलमपूरमध्ये सोमवारी झालेल्या पहिल्या प्रचारसभेतही राहुल गांधींनी दिल्लीतील प्रदुषण, पायाभूत सुविधांचा अभाव अशा मुद्द्यांवरून केजरीवाल सरकारवर तीव्र टीका केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा