नवी दिल्ली : ‘‘आफ्रिकेतील देशांच्या महासंघाचा ‘जी-२०’ राष्ट्रगटात सदस्य म्हणून समावेश आणि भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक मार्गिकेसंदर्भात झालेल्या निर्णयामुळे जगातील बलाढय़ देशांत भारताने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या प्रस्तावित आर्थिक मार्गिकेची तुलना मोदींनी भारताच्या इतिहासातील समृद्ध काळातील व्यापार-व्यवसायाचा मुख्य माध्यम असलेल्या रेशीम मार्गाशी (सिल्क रूट) केली. आगामी शेकडो वर्षे ही मार्गिका जागतिक व्यापाराचा मुख्य आधार बनेल आणि या मार्गिकेची सुरुवात भारतीय भूमीवर झाली यांची इतिहासात कायमची नोंद राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा >>> “महिला कुस्तीपटूंचं शोषण करण्याची एकही संधी सिंह सोडत नव्हते”, दिल्ली पोलिसांचा न्यायालयात दावा
‘मन की बात’ या आकाशवाणीवरील आपल्या मासिक संवाद सत्रातील १०५ व्या भागात मोदी बोलत होते. त्यात मोदींनी चंद्रयान-३ आणि ‘जी-२०’चे यश, रोजगारनिर्मितीमध्ये पर्यटनाची भूमिका, भारतातील जागतिक वारसा स्थळांची वाढती संख्या आणि भारतीय संगीताबद्दल जगभरातील वाढती आस्था या विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला. त्यांनी सण-उत्सव काळात स्थानिक उत्पादने खरेदी करण्याच्या मंत्राची आठवण करून दिली.
देशाचा प्रत्येक भाग ‘वंदे भारत’ने जोडणार : मोदी
नवी दिल्ली : ‘‘पायाभूत सुविधांच्या विकासाची सध्याची गती आणि प्रमाण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारे आहे. लवकरच देशाचा प्रत्येक भाग वंदे भारत रेल्वेगाडय़ांच्या सुविधेने जोडला जाईल. तो दिवस फार दूर नाही.’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी व्यक्त केला.
मोदी यांनी ११ राज्यांतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ ‘वंदे भारत’ रेल्वेगाडय़ांना दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील.
‘जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्रॅम’च्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (आयआयएम) सारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांतील विद्यार्थी यात सहभागी होतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे. या कार्यक्रमात भारताच्या आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी असतील. या कार्यक्रमात मी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान