व्हिसा सुलभीकरणासह एकूण चार करारांवर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला १.४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारत आणि मालदीवने हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्याचा संकल्प जाहीर केला. व्हिसा सुलभीकरणासह दोन्ही देशांमध्ये एकूण चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर सोली रविवारी भारतात दाखल झाले. महिन्याभरापूर्वी मालदीवच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडली. द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असे पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्हाला मालदीवबरोबर चांगले व्यापारी संबंध हवे आहेत. भारतीय कंपन्यांना मालदीवमध्ये चांगली संधी आहे. परस्परांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांसाठी आम्ही आमच्या देशाचा वापर करू देणार नाही, असेही मोदींनी सांगितले. मालदीवमधल्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताकडून १.४ अब्ज डॉलरचे आर्थिक साहाय्य मोदींनी जाहीर केले.
मालदीवच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी चिनी कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगात मालदीवला सर्वात जास्त विश्वास भारतावर आहे. मालदीवच्या आधीच्या अध्यक्षांनी चीनला झुकते माप देऊन भारतविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. चीनच्या महत्त्वाकांक्षा पाहता रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी मालदीव महत्त्वाचा देश आहे.