नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ‘इंडिया’मध्ये सुरू झालेला वाद सोमवारी, १८व्या लोकसभेच्या पहिल्या संसद अधिवेशनातही कायम राहिला. सोमवारी, काँग्रेससह विरोधी पक्षांचे खासदार राज्यघटनेची प्रत घेऊन आले आणि परिसरात निदर्शने केली. याला प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आणीबाणी’ची आठवण करून दिली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांकडून झाडल्या गेलेल्या या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीतून हे संसद अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय असाधारण! केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने भाजपवर शरसंधान साधताना, भाजपचा संविधान नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. हाच मुद्दा घेऊन काँग्रेसच्या (पान ९ वर)(पान १ वरून) खासदारांनी सोमवारी संसदेच्या आवारात आवेशपूर्ण निदर्शने केली. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सुमारे शंभर खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन भाजपला इशारा दिला. जुन्या व नव्या संसदभवनांच्या मधोमध असलेला महात्मा गांधींचा पुतळा हलवण्यात आला असला तरी, त्याच स्थळावर उभे राहून विरोधकांनी शक्तिप्रदर्शन केले. ‘आम्ही संविधानाचे रक्षण करू’, ‘लोकशाहीचे रक्षण करू’ अशा घोषणा दिल्या. या निदर्शनांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकचे टी. आर. बालू, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शिवसेना-ठाकरे गटाचे अरविंद सावंत आदींचा समावेश होता. लोकसभेच्या सभागृहातही विरोधी बाकांवरून संविधानाची प्रत दाखवत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदींना संविधानाच्या मूल्यांची आठवण करून दिली.

हेही वाचा >>> “…म्हणून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची खाती मागितली नाही”; प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण!

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोदी व शहा यांच्यावर तीव्र टीका केली. हे दोघेही संविधानाच्या मूल्यांवर आघात करत असून या देशातील जनता आणि विरोधी पक्ष हे सहन करणार नाहीत, असा इशारा गांधी यांनी दिला. त्यामुळेच सदस्यपदाची शपथ घेताना संविधानाची प्रत हाती घेतल्याचे ते म्हणाले. याला प्रत्युत्तर देत पंतप्रधानांनी आणीबाणीवरून काँग्रेसला टोला लगावला. पंरपरेप्रमाणे अधिवनेशाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्याआधी त्यांनी केंद्र सरकारचा अजेंडा स्पष्ट केला. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले, की उद्या मंगळवारी २५ जून तारीख आहे. संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी लढणाऱ्यांना व लोकशाही परंपरांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हा दिवस विसरता येणार नाही. भारताच्या लोकशाहीतील काळ्या अध्यायाला मंगळवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संविधानाची अशी फसवणूक पुन्हा होऊ देणार नाही, असा संकल्प देशवासीयांनी केला पाहिजे. संविधानाने नमूद केल्याप्रमाणे चैतन्यशील लोकशाही सुनिश्चित करण्यासाठी आणि सामान्य माणसाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नव्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढले असले तरी, भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) आक्रमक पवित्रा कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहेत.