नवी दिल्ली : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनचे संबंध अभूतपूर्व स्वरूपात पुढे जाणार आहेत, असा विश्वास ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी व्यक्त केला. दोन्ही देशांना परस्परांची कधी नव्हती एवढी आवश्यकता आहे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
दोन्ही देशांनी मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पुढील दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही, असे जॉन्सन यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, आपण धोकादायक आणि कठीण कालखंडातून जात आहोत. दोन्ही देशांना परस्परांची पूर्वीपेक्षा अधिक आवश्यकता आहे.