२६/११ च्या मुंबई हल्ल्यात माझा हात होता हे सिद्ध करून दाखवावच. जगाच्या अंतापर्यंत ते तुम्हाला जमणार नाही, असं आव्हान पाकिस्तानातील दहशतवादी जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारताला दिले आहे. ‘जमात-उद-दवा’ संघटनेच्या ट्विटर अकाऊंटवर हाफिज सईदच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने सुषमा स्वराज यांना काही उत्तर दिलेलं नाही. पण मी भारताला उत्तर देतो. मुंबई हल्ल्याला सात वर्षे होऊनही तुम्ही काहीही सिद्ध करू शकलेला नाहीत. यापुढेही काहीच होणार नाही. जगाचा अंत होईपर्यंत भारत ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असे हाफिज सईद भाषणात म्हणाला आहे.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच पाकिस्तानन दौरा केला. या दौऱयात स्वराज यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा