पीटीआय, अस्ताना

भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील उर्वरीत समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि संबंध ‘स्थिर आणि पुनरुज्जीवित’ करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात गुरुवारी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक बैठक झाली.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
Ajit pawar on NCP BJP Alliance
Gautam Adani BJP-NCP Alliance Talks : “राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
multiple languages issue considered in constituent assembly
संविधानभान : भारताचे बहुभाषिक कवित्व
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
justin treudeau s jaushankar canada india
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं वृत्तसंस्थेलाच केलं ब्लॉक; आगळिकीवर भारताची तीव्र नाराजी!

जयशंकर म्हणाले की वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) ) आदर केला पाहिजे. दोन्ही नेत्यांमधील संभाषणात जयशंकर यांनी सीमा व्यवस्थापनासाठी भूतकाळात दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी केलेल्या संबंधित द्विपक्षीय करारांचे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करण्याची गरजही व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जयशंकर आणि वांग यांनी पूर्व लडाखमधील एलएसीवरील प्रलंबित समस्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी सखोल चर्चा केली जेणेकरून ‘द्विपक्षीय संबंध स्थिर व्हावे आणि संबंधांची पुनर्निर्मिती केली जावी’. बैठकीत, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, दोन्ही बाजूंमधील संबंध परस्पर आदर, हित आणि परस्पर संवेदनशीलतेवर आधारित असले पाहिजेत.

दोन्ही देशांमधील सामान्य संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता महत्त्वाची आहे, असा भारताचा विश्वास आहे. ‘‘एलएसीबाबत दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही बाजूंच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील बैठका सुरू ठेवण्यास आणि प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी चर्चा करण्यास सहमती दर्शविली,’’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. भारत-चीन सीमा प्रकरणांवर समन्वय (डब्ल्यूएमसीसी) लवकरच भेटले पाहिजे. दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली की सीमावर्ती भागात सध्या तणाव वाढवणे कोणाच्याही हिताचे नाही.

हेही वाचा >>>हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सहा महिन्यांनंतर पुन्हा स्वीकारला पदभार!

‘‘परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पूर्व लडाखमधील उर्वरित भागातून सैन्य पूर्णपणे काढून टाकण्याची आणि सीमेवर शांतता पुनर्संचयित करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्यावर भर दिला जेणेकरून द्विपक्षीय संबंध सामान्य होण्याच्या मार्गात जे काही अडथळे असतील ते कायम दूर राहतील,’’ असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यातील मध्य पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या दरम्यान या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. मे २०२० पासून भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.

दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांना एकटे पाडा’

भारताने गुरुवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांना उघडकीस आणून ‘एकटे’ पाडण्यास सांगितले. भारताने चीन आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले आणि दहशतवादावर अंकुश ठेवला नाही तर तो प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका ठरू शकतो, असे सांगितले. कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश देताना जयशंकर म्हणाले की, एससीओच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक म्हणजे दहशतवादाशी लढा देणे. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला न्याय्य किंवा माफ करता येणार नाही.’’ चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या परिषदेला हजेरी लावली. परराष्ट्र मंत्र्यांनी परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कझाकिस्तानचे कौतुक केले आणि एससीओच्या पुढील अध्यक्षपदासाठी चीनला भारताच्या शुभेच्छा दिल्या. एससीओचे कामकाज बीजिंगमधून चालते. भारत, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गिझ, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे त्याचे नऊ सदस्य देश आहेत.