मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथे रुग्णांची संख्या रोज वाढत असून रुग्णालये अपुरे पडू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात मात्र रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. मार्च २०२० पासून सोमवारी पहिल्यांदाच नव्या करोनाग्रस्तांची संख्या १०० पेक्षा खाली गेली आहे. तसेच मार्च २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवस एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
हेही वाचा >>> मोठी बातमी! लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित
देशात करोनाचा संसर्ग सध्या अटोक्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशात मार्च २०२० पासून पहिल्यांदाच नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. तसेच २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी भारतात ८३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी हीच संख्या ११४ होती. याआधी भारतात १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद २७ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा खाली आलेली नव्हती.
हेही वाचा >>> UAE च्या राजघराण्यातील कर्मचारी असल्याचं भासवलं, भामट्यानं दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलला लावला २३ लाखांचा चुना!
सध्या दक्षिण भारतासह महाराष्ट्रात नव्याने करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात देशात १०६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यातील ८३१ रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. दिल्लीमध्ये सोमवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये एकूण ३२ नवे रुग्ण आढळले.
हेही वाचा >>> पंजाबमधील सुरक्षा त्रुटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले “त्या तरुणाने जे केले त्याला…”
दरम्यान, सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी चीनमधील करोनास्थिती पाहता संपूर्ण देशात प्रतिबंतात्मक उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सर्व राज्यांनी सतर्कतेचा पवित्रा घेतलेला आहे.