भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता ही लाट ओसरत आहे. मात्र, करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. या नवीन  डेल्टामुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान, एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतात विकसीत झालेल्या लसीला अमेरिकेने करोनाविरूद्ध प्रभावी असल्याचे म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या मदतीने भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरीकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ने दिली आहे.

कोव्हॅक्सिन लस शरीरात प्रतिकारशक्ती तयार करते. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तर यामध्ये शरीरात अँटीबॉडी आढळल्या आणि  कोव्हॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हटले आहे.

हेही वाचा- सीरममध्ये जुलै महिन्यात मुलांसाठी Novavax लशीच्या चाचणीस सुरूवात होण्याची शक्यता

७८ टक्के लस प्रभावी

कोव्हॅक्सिन लस शरीरात वेगात अँटीबॉडी तयार करते. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील परिनाम ही लस सुरक्षित आणि चांगली असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे. ही लस ७८ प्रभावी आहे. तसेच करोनाच्या नवीन व्हेरिएंटवर ही लस ७० टक्के प्रभावी आहे. करोनाच्या B.1.17 (अल्फा) आणि B.1.617 (डेल्टा) व्हेरिएंटवर ही लस प्रभावीपणे काम करते, असे अमेरिकेन अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या मदतीने भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस बनवली आहे. अल्फा B.1.1.7 व्हेरिएंट सर्वातआधी ब्रिटनमध्ये आढळला होता. तर डेल्टा B1.617 व्हेरिअंट सर्वातआधी भारतात आढळून आला.

Story img Loader