भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता ही लाट ओसरत आहे. मात्र, करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. या नवीन डेल्टामुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान, एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतात विकसीत झालेल्या लसीला अमेरिकेने करोनाविरूद्ध प्रभावी असल्याचे म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या मदतीने भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरीकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in