लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल ६२.३६ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देशात विश्वविक्रम घडला आहे. कारण, या सात टप्प्यांत ६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल ३१ कोटी १४ लाख महिला मतदार आहेत.
हेही वाचा >> लोकसभा निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल? निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली महत्त्वाची माहिती
सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करताना आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ९६.६ कोटी मतदार आहेत. यामध्ये ४९.७ कोटी पुरुष मतदार आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. यापैकी एकूण ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच, यंदा देशात ६२. ३६ टक्के मतदान झालं आहे. यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने निवडणूक आगोयाच्या आयुक्तांनी उभं राहून दाद दिली.
#WATCH | On Lok Sabha elections, CEC Rajiv Kumar says, "We have created a world record of 642 million voters. This is 1.5 times voters of all G7 countries and 2.5 times voters of 27 countries in EU." pic.twitter.com/MkDbodZuyg
— ANI (@ANI) June 3, 2024
जम्मू आणि काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. गेल्या चार दशकातील हे सर्वाधिक मतदान होतं, असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
लापता जेंटलमनवरून प्रत्युत्तर
मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लापता जेंटलमन म्हणत डिवचलं गेलं होतं. या टीकेवरही त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कधीच बाहेर गेलो नव्हतो.प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधत होतो. मतदानाच्या काळात आम्ही जवळपास १०० प्रसिद्धी पत्रके काढली, असं राजीव कुमार म्हणाले.
मतदान प्रक्रियेच्या काळात तब्बल १० हजार कोटींची रोख रक्कम जप्त केली असून २०१९ च्या तुलनेत ही तीनपट अधिक रक्कम आहे. यासाठी स्थानिक गटांना सक्रीय करण्यात आलं होतं, असं राजीव कुमार म्हणाले. ६८ हजार मॉनिटरिंग टीम होत्या. तर दीड पोलिंग आणि सुरक्षा दल या निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते, अशीही माहिती त्यांनी दिली.