संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा विनाधार आरोप केले. यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं. भारताचे स्थायी मिशन प्रतिनिधी प्रतिक माधूर यांनी सर्वांसमोर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं आणि दहशतवाद्यांना आक्षय देत असल्याचं सुनावलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिक माथूर म्हणाले, “भारताने यावेळी पाकिस्तानच्या चिथावणीखोर आरोपांना प्रत्युत्तर न देण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तानने आम्ही संयुक्त राष्ट्रात त्यांना दिलेली आधीची उत्तरं (राईट टू रिप्लाय) पाहावीत. पाकिस्तान स्वतः दहशतवादाला खतपाणी घालतंय, दहशतवाद्यांना आश्रय देतंय. त्यांनी त्यांचा हा इतिहास पाहावा.”

“दोन दिवस आपण केलेल्या चर्चेत संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी शांतता हाच एकमेव मार्ग आहे यावर आपल्या सर्वांचं एकमत झालेलं असताना पाकिस्तानने विनाकारण अशी चिथावणी देणे खेदजनक आणि चुकीचे आहे,”असंही प्रतीक माथूर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल…”; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादावर केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने आरोप केले होते. त्यावर प्रतिक माथूर यांनी ही प्रतिक्रिया दिली. जयशंकर म्हणाले होते, “भारत आणि पाकिस्‍तानमध्ये असलेल्या मुलभूत मतभेदांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश कधीही समृद्ध होऊ शकत नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India criticize pakistan over terrorism issue in un general assembly pbs