India on Gotabaya Rajapaksa left Shrilanka : श्रीलंकेत नागरिकांनी देशाच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीला जबाबदार धरत सत्ताधाऱ्यांविरोधात उग्र आंदोलन केलंय. आंदोलकांनी अगदी राष्ट्राध्यक्षांच्या घरालाही घेराव घातला. अशातच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे आपल्या कुटुंबासह पळून गेल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यांना श्रीलंकेतून बाहेर जाण्यासाठी भारताने मदत केल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील भारतीय दुतावासाने हे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली.

भारतीय दुतावासाने ट्वीट करत म्हटलं, “श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे आणि बसिल राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर जाण्यासाठी भारताने मदत केल्याच्या प्रसार माध्यमांधील विनाधार बातम्यांचं भारतीय उच्चायुक्त खंडन करते. भारत श्रीलंकेतील नागरिकांना पाठिंबा देणं सुरूच ठेवेल याचा आम्ही पुनरुच्चार करतो. ते समृद्धी आणि प्रगतीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने लोकशाही संस्था आणि घटनात्मक चौकटीच्या मदतीने प्रयत्न करत आहेत.”

alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?

गोटाबाया राजपक्षे यांचे श्रीलंकेतून पलायन

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी ( १३ जुलै ) पहाटे देशातून पलायन केले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे आपली पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवला गेल्याची माहिती आहे. श्रीलंकन हवाई दलाच्या विमानातून त्यांनी देश सोडला असल्याचे वृत्त आहे. एका रिपोर्टनुसार, श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे पहाटे लष्कराच्या अँटोनोव्ह-३२ विमानातून मालदीवला रवाना झाले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार अँटोनोव्ह-३२ विमानात गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षक होते.

यानंतर गाटाबाय राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर जाण्यास भारताने मदत केल्याचाही आरोप झाला. यानंतरच भारतीय उच्चायुक्ताने हे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा : श्रीलंकेतले सामान्यजन संघटित कसे झाले?

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच श्रीलंकेतील नागरिकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण परिस्थिती श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. श्रीलंकेतील चिघळत चाललेली परिस्थिती पाहता गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपला राजीनामा अद्यापही दिला नाही. त्यापूर्वीच त्यांनी देशातून पलायन केले.

Story img Loader