२०५० पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे, असे मत युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (UNFPA) भारताच्या प्रमुख एंड्रिया वोजनार यांनी मांडले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारताची सध्य परिस्थिती, लोकसंख्या आणि या लोकसंख्येची भविष्यातील वाटचाल अशा विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत. यामध्ये भारतातील तरुणांची लोकसंख्या, वयोवृद्धांची लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतर आणि हवामानातील बदल अशा विविध विषयांना स्पर्श करत त्यांनी महत्त्वाची निरिक्षणे मांडली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : आंदोलक विद्यार्थ्यांना यश! बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाकडून बहुतांश नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द

शिक्षण, आरोग्यसेवा, गृहनिर्माणमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची गरज

यूएनएफपीएच्या भारताच्या प्रमुख एंड्रिया वोजनार म्हणाल्या की, “२०५० पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता असल्याने आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि पेन्शनमध्ये अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या महिलांवर वृद्धत्वाच्या काळात एकटे राहण्याची आणि गरिबीचा सामना करावा लागण्याची वेळ येणार आहे, अशा महिलांचा विचार करुन त्यांच्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे.” पुढे वोजनार म्हणाल्या की, २०५० मध्ये ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची संख्या दुप्पट होऊन ३४६ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि पेन्शन योजनांमध्ये वाढीव गुंतवणुकीची गरज आहे. विशेषत: एकट्या राहणाऱ्या आणि गरिबीचा सामना करणाऱ्या वृद्ध महिलांसाठी या तरतुदी अधिक गरजेच्या असल्याचेही मत त्यांनी मांडले आहे.

“भारतात सध्या १० ते १९ वर्षे वयोगटातील २५२ दशलक्ष लोकांसह तरुणांची लोकसंख्याही प्रचंड मोठी आहे”, असे वोजनार म्हणाल्या. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी आतापासूनच गुंतवणूक करावी लागेल. नोकरीचे प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि लिंगभाव समानताही आणावी लागेल. यामुळे तरुणांची लोकसंख्याही वाढेल आणि या कृतींमुळे शाश्वत विकासासाठी मदत होईल, असे त्या म्हणाल्या. २०५० पर्यंत भारतातील ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात वसलेली असेल, असा अंदाज वोजनार यांनी व्यक्त केला. झोपडपट्ट्यांमध्ये होत असलेली वाढ, वायू प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्मार्ट सिटीज्, मजबूत पायाभूत सुविधा आणि परवडणारी घरे तयार करणे फार आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा :Baba Ramdev on Kanwar Yatra order: “मला अडचण नाही, मग रेहमानला…”, बाबा रामदेव यांच्याकडून हॉटेलवरील पाट्या बदलण्याचे समर्थन

महिलांच्या समस्यांवर अधिक लक्ष देण्याची गरज

या मुलाखतीमध्ये वोजनार यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा अधिक विचार करण्याची गरज व्यक्त केली. जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि लैंगिक समानता आणण्यासाठी आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगारावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पुढे त्या म्हणाल्या की, देशातील अंतर्गत आणि बाह्य स्थलांतराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. “हवामानातील बदलामुळे महिलांच्या पुनरुत्पादन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होते, गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये गुंतागुंत निर्माण होते. लैंगिक समानता आणि शाश्वत विकासासाठी या समस्यांचे निराकरण करणे फार महत्त्वाचे आहे.” असेही त्या म्हणाल्या.