Syria : इस्लामी बंडखोरांनी दमास्कसमध्ये सत्ता काबीज केल्यामुळे आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेल्याने भारताने जम्मू आणि काश्मीरमधील यात्रेकरूंसह आपल्या ७५ नागरिकांना सीरियातून बाहेर काढले.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि उपलब्ध व्यावसायिक विमानांनी भारतात परततील.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त

एमईएच्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे की, त्या देशातील घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. “ सईदा झैनब येथे अडकलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील ४४ ‘झैरीन’चा समावेश निर्वासितांमध्ये आहे. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि उपलब्ध व्यावसायिक फ्लाइटने भारतात परततील,” असे त्यात म्हटले आहे.

आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी!

“भारत सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. सीरियामध्ये उरलेल्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +९६३ ९९३३८५९७३ (व्हॉट्सॲपवर देखील) आणि ईमेल आयडी (hoc.damascus@mea.gov.in) वर अपडेट्ससाठी संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकार परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत राहील,” असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >> सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

बंडखोरांची धक्कादायक मुसंडी

२७ नोव्हेंबर रोजी सीरियाच्या वायव्येस मोर्चेबांधणी केलेल्या बंडखोरांनी दक्षिणेकडे सरकण्यास सुरुवात केली. या बंडखोरांच्या अनेक तळांवर गेल्या काही दिवसांमध्ये बशर यांच्या फौजांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इराण, रशियासारख्या देशांनी हवाई हल्ले केले होते. पण सीरियाच्या लष्कराकडे बंडखोरांचा रेटा थोपवण्याची क्षमता नव्हती. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव होऊ लागला. २९ नोव्हेंबर रोजी बंडखोरांनी अलेप्पो या सीरियाच्या दुसऱ्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला. आणखी पुढे सरकरत ५ डिसेंबर रोजी हमा आणि ७ डिसेंबर रोजी हॉम्स हे सीरियाचे तिसरे मोठे शहर बंडखोरांनी जिंकून घेतले. दमास्कस हे राजधानीचे शहर तुलनेने फारच कमी प्रतिकारासह बंडखोरांच्या ताब्यात आले.  

कोण आहेत बंडखोर?

बंडखोरांमध्ये प्रमुख आहे हयात तहरीर अल शाम (एचटीएस) हा गट. हे पूर्वी अल कायदाबरोबर होते. २०१७मध्ये फुटून बाहेर पडले. त्यांनीच सीरियाची प्रमुख शहरे जिंकली. पण आणखी एक गट त्यांच्या आधी दमास्कसमध्ये पोहोचला. सीरियाच्या दक्षिणेकडे बशर राजवटीविरोधात सुरू असलेल्या चकमकींमध्ये अनेक स्थानिक गट सहभागी झाले आहेत. त्यांनी दारा या प्रांतावर ताबा मिळवला. २०११मध्ये येथेच अरब स्प्रिंग अंतर्गत उठाव झाला होता. हे गट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत होते. त्यांनी दमास्कसच्या काही उपनगरांमध्ये प्रवेश केला. याशिवाय सीरियाच्या इशान्येकडे सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) हा क्रुदिश बंडखोरांचा एक गट आहे. सीरियन फौजांविरोधात हा गटही लढत आहे.

Story img Loader