S Jaishankar : देशाचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे नेहमीच त्यांच्या मुत्सद्दी प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. आता देखील एस.जयशंकर यांनी एका प्रश्नांवर दिलेल्या उत्तरामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. एस. जयशंकर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, जर तुम्हाला उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याबरोबर रात्रीचे जेवण करण्याची संधी मिळाली तर तुम्हाला कोणाबरोबर जेवण करायला आवडेल? यावर मंत्री एस. जयशंकर यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, “आता नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मला उपवास करायला आवडेल”, असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. त्यांनी दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एस जयशंकर यांनी याआधीही अनेकवेळा आपल्या उत्तरांनी सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता एका मुलाखतीत यासंदर्भातील प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा रंगली आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”

हेही वाचा : ‘मृत अविवाहित मुलाचे गोठवलेले वीर्य पालकांच्या स्वाधीन करा’; दिल्ली उच्च न्यायालयाचा ‘या’ प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल!

दरम्यान, एस.जयशंकर हे जागतिक मंचावर अनेक प्रश्नांची आपल्या खास शैलीत उत्तरे देत असतात. याआधी युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत आणि रशियासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा देखील त्यांनी दिलेल्या उत्तरावर मोठी चर्चा झाली होती, तसेच त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र, त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, मंत्री एस.जयशंकर यांना ज्यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, ते अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आहेत. आता अमेरिकेचे उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका देखील केली होती. अदाणी प्रकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं, असंही जॉर्ज सोरोस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर जॉर्ज सोरोस यांनी भारतातील लोकशाही आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. ९२ वर्षीय जॉर्ज सोरोस यांचा कोणताही राजकीय पक्ष नाही. मात्र, ते अनेकदा जगभरातील नेत्यांवरही टीका करत असतात.

परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर पाकिस्तानात जाणार

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर या महिन्याच्या अखेरीस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. पाकिस्तानात जाणारे ते गेल्या नऊ वर्षांतील पहिले परराष्ट्र मंत्री ठरतील. सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये शेवटची भेट दिली होती. आता मंत्री एस जयशंकर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानला (
S Jaishankar Pakistan Visit) जाणार आहेत.

Story img Loader