हमास-इस्रायल यांच्यात आधीच युद्ध चालू असताना इराणने मंगळवारी आपले शेजारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यावर, दोन्ही देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत गंभीर परिणामांचा इशारा दिल्याने पश्चिम आशियात नवा संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान याप्रकरणी आता भारताने भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारताची भूमिका स्पष्ट केली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारताने यापूर्वीच दहशतवादविरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इराण आणि पाकिस्तानातील संबंधांबाबत बोलताना रणधीर जैस्वाल म्हणाले, “हा इराण आणि पाकिस्तानमधील मुद्दा आहे. भारताने कायम दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूतेची भूमिका घेतली आहे. देश स्वसंरक्षणार्थ कलेल्या कृती आम्हाला समजतात.”

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
nagpur bomb threat on email of Hotel Dwarkamai near Ganeshpeth station
“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लवकरच स्फोट होणार,” ईमेलवरील धमकीने उपराजधानीत खळबळ…
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य

हेही वाचा >> “आम्ही पाकिस्तानच्या…”, क्षेपणास्रं हल्ल्यानंतर इराणचं स्पष्टीकरण; म्हणाले, “गाझामधील युद्धाचा…”

इराणकडून क्षेपणास्रे डागून हल्ला

इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम आणि दौरेही त्वरित रद्द केले.

इराणच्या हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने इराणच्या राजदूतांकडे,‘तुम्ही पाकिस्तानी हवाई हद्दीचा भंग केला आहे’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, ‘‘इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून कुरापत काढली आहे’,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवाय, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाच्या उघड उल्लंघनाचा निषेध नोंदवण्यासाठी इराणच्या प्रभारी राजदूतांना पाचारण करण्यात आले असून या हल्ल्याच्या संभाव्य परिणामाची जबाबदारी पूर्णपणे इराणची असेल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय पडसाद…

इराणच्या हल्ल्यामुळे प्रादेशिक तणावात भर पडली आहे. असे प्रकार थांबले पाहिजेत, असे निवेदन फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी इराकवरील हल्ल्याचा निषेध केला. दुसरीकडे चीनने पाकिस्तान आणि इराणला संयम दाखवण्याचे आवाहन करताना तणावास कारणीभूत ठरणारी कृती टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader