अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचे ठोस पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागले आहेत. दाऊदच्या बायकोच्या नावावर असलेल्या फोन बिलवरून हे पुरावे मिळाले आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स‘ या इंग्रजी वृत्तपत्राने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला आहे.
दाऊदने आता चक्क मिशीच कापली आहे. तपास संस्थेपासून वाचण्यासाठी त्याने ही युक्ती लढवली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती दाऊदचा नवा फोटो लागले आहे. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाची माहितीही संस्थांना मिळाली आहे.  दाऊद सध्या त्याची पत्नी, तीन मुली आणि एका मुलासह कराचीजवळच्या क्लिफटनमध्ये राहतो असे या वृत्तात म्हटले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेला दाऊदचा पाकिस्तानातला पत्ता, फोनबील, पासपोर्ट ही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे दाऊद आमच्या देशात नाही असे सांगणा-या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
दाऊदच्या कुटुंबियांच्या कराची-दुबई प्रवासाची कागदपत्रे हातील लागली असून, फोनची बिल ही दाऊदची बायको मेहजबीन शेख हिच्या नावावर आहेत. दाऊदच्या कुटुंबियांच्या कराची-दुबई प्रवासाची कागदपत्रे हातील लागली आहेत. दाऊदकडे तीन पाकिस्तानी पासपोर्ट आणि कराची येथील घर सोडून अजून इतर  दोन  ठिकाणी घरे असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.

Story img Loader