पीटीआय, थिम्पू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग तोबगे यांनी शनिवारी येथे भारताच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन केले. या रुग्णालयात महिला आणि मुलांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा प्रदान केल्या जातील. दोन्ही देशांदरम्यान विकास सहकार्याचे झळाळते उदाहरण म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जात आहे.

‘ग्याल्तसुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल’ हे अत्याधुनिक सेवा आणि सुविधा असलेले १५० खाटांचे रुग्णालय भारताच्या मदतीने बांधण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी एक्सवर लिहिले की दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणारे हे रुग्णालय अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण म्हणून काम करेल. यामुळे भविष्यातील पिढी निरोगी असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>‘मविआ’चा जागा वाटपाचा तिढा संपेना, पण काँग्रेसकडून यादी जाहीर; महाराष्ट्रातून आणखी चौघांना उमेदवारी

भारताने दोन टप्प्यांमध्ये हे रुग्णालय बांधण्यासाठी सहाय्य केले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी २२ कोटी इतका खर्च आला होता. तो भाग २०१९पासून कार्यरत आहे. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम २०१९मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यासाठी ११९ कोटींचा खर्च आला आणि ते अलिकडेच पूर्ण झाले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India help for medical care in bhutan amy
Show comments