तांदूळ आणि गव्हाची निर्यात करून भारताने जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात मदत केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत भारताने २.१ लाख टनांवर कृषी उत्पादनांची निर्यात केल्याचे पवार यांनी सांगितले.
देशात दरवर्षी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असून, कृषी क्षेत्राने ११ व्या योजनेतील उद्दिष्टानुसार चार टक्के विकासदर गाठल्याचे पवार यांनी सहकारविषयक एका परिषदेत बोलताना स्पष्ट केले. र्सवकष विकास, रोजगार निर्मिती आणि जीवनमान उंचावण्यासाठी सहकार क्षेत्राचे सध्याच्या काळात महत्त्व आहे. नागरी सहकारी बँका तसेच छोटय़ा-मोठय़ा सहकारी संस्थांनी ग्रामीण आणि निमशहरी भागाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले. २०११-१२ मध्ये देशात २५९.३२ दशलक्ष टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाले. या वर्षी २५५.३६ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा