RBI चे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथ अर्थात भारतातील हिंदू विकास दराविषयी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. खासगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्यादर, मंदावलेला आर्थिक विकास दर यामुळे आपला भारत देश हा हिंदू विकास दराच्या जवळ आला आहे असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. रघुराम राजन यांनी केलेल्या हिंदू ग्रोथ रेटच्या वक्तव्यामुळे हिंदू ग्रोथ रेट काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे हिंदू रेट ऑफ ग्रोथ?
हिंदू रेट ऑफ ग्रोथ अर्थशास्त्रातील एक थिअरी आहे. याचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडलेला नाही. मात्र आर्थिक मंचांवर या शब्दाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवबंलून होते. समाजात तेव्हा बरीच गरीबी होती. पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रेल्वे होत्या. रस्त्यांचा अभाव होता.
मात्र पुढे घडलं असं की हळूहळू या सगळ्या गोष्टींची निर्मिती सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्याला ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत हा ग्रोथ रेट बराच कमी झाला होता. या मंद गतीने विकास करणाऱ्या विकास दराविषयी बोलताना १९७८ मध्ये हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा उल्लेख झाला होता. हा उल्लेख त्यावेळी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक राज कृष्ण यांनी हे नाव घेतलं होतं. राज कृष्ण यांनी १९७८ मध्ये हे नाव घेतल्यानंतर अर्थशास्त्रज्ञ हे नाव घेऊ लागले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी आपला देश आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता. विकास दर हा ३० वर्षे तसाच होता. हा विकास दर ३.५ टक्के किंवा त्यापेक्षाही खाली होता. त्यामुळे हिंदू वाढीचा दर असा शब्द प्रचलित झाला.
१९९१ मध्ये आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाच्या सुरुवातीनंतर ‘हिंदू वाढीचा दर’ मंद गती सोडून देशाचा विकास दर झपाट्याने वाढला. विशेषतः २००३ ते २००८ या काळात देशाचा विकास दर सरासरी ९ टक्के इतका होता.