PM Modi post on Vijay Diwas:भारताने १९७१ च्या युद्धात विजय मिळवत इस्लामाबादच्या तावडीतून पूर्व पाकिस्तानची मुक्तता केली आणि बांगलादेशचा जन्म झाला. या युद्धाची आठवण आणि शहीद सैनिकांचे स्मरण करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिनानिमित्त संदेश देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टवर आता बांगलादेशचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार काम करत आहेत. या सरकारचे विधी सल्लागार आसिफ नझरुल यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर टीका केली असून १९७१ च्या युद्धात भारत हा बांगलादेशचा फक्त मित्र होता, असे म्हटले आहे.

१६ डिसेंबर १९७१ साली पाकिस्तानी सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल एए खान नियाझी यांनी भारतीसमोर शरणागती पत्करली आणि भारतीय लष्कराचे कमांडर जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. ९३ हजार पाकिस्तानी सैन्यांनी शरणागती पत्करल्याने पूर्व पाकिस्तानमधील पश्चिम पाकिस्तानच्या क्रूर राजवटीचा शेवट झाला. भारताने या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र बांगलादेशमध्ये काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. सध्या बांगलादेशमध्ये लष्कराच्या पाठिंब्यावर असलेले अंतरिम सरकार काम करत आहे.

najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका

हे वाचा >> Indian Navy Day 2024: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणारे ऑपरेशन ट्रायडंट काय होते? त्याचा नौदल दिनाशी काय संबंध?

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही १९७१ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतूट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि आपल्याला गौरव मिळवून दिला. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आणि त्यांच्या अविचल आत्म्याला अभिवादन करण्याचा आहे. त्यांचे बलिदान भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासात अमिट राहील.”

सदर पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी बांगलादेश किंवा पाकिस्तान यांचा उल्लेख केलेला नव्हता. मात्र मोहम्मद युनूस यांचे विधी सल्लागार आसिफ नझरुल यांनी या पोस्टवर आक्षेप घेतला आहे. १९७१ च्या विजयात भारत हा फक्त बांगलादेशच मित्र राष्ट्र होता, असे त्यांनी म्हटले. नझरुल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, हा फक्त बांगलादेशचा विजय आहे. भारत त्या विजयात सहकारी होता, यापेक्षा अधिक काही नाही.

हे ही वाचा >> Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनाचा नेता हसनत अब्दुल्ला यानेही पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर टीका केली आहे. “पाकिस्तानपासून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी १९७१ चा लढा होता. पण पंतप्रधान मोदींच्या पोस्टवरून हा फक्त भारताचा लढा आणि यश होते, असे दिसते. त्यांच्या पोस्टमधून बांगलादेश पूर्णपणे वगळ्याचे दिसत आहे”, अशी पोस्ट हसनत अब्दुल्ला यांनी टाकली आहे. जर भारताला हा त्यांचा विजय वाटत असेल तर बांगलादेशच्या अखंडता, स्वातंत्र्य यावर हा थेट हल्ला आहे, असेही हसनत याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

Story img Loader