पाकिस्तानच्या ‘मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान’ (MQM-P) या पक्षाचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी कराचीमधील ढासळत्या पायाभूत सोयी-सुविधांबाबत संसदेत बोलत असताना भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचा उल्लेख केला. सय्यद मुस्तफा कमाल यांचे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते म्हणाले, भारत चंद्रावर पोहोचला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कराचीमधील मुलं उघड्या गटारांमध्ये पडून जीव गमावत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी (दि. १५ मे) बोलत असताना कमाल म्हणाले, जग एकाबाजूला प्रगती करत आहे. भारत थेट चंद्रवार पोहोचला आहे. मात्र कराचीमध्ये अजूनही उघड्या गटारात पडून लहान मुलांना जीव गमवावा लागत आहे. टीव्हीवर आम्ही बातमी पाहतो की, भारताने कसे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. या बातमीच्या अवघ्या काही सेकंदात दुसरी बातमी टीव्हीच्या स्क्रिनवर झळकते की, कराचीमधील उघड्या गटारात पडून लहान मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी बातम्या दर तिसऱ्या दिवशी ऐकायला मिळतात.

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; अमित शहा यांचा विश्वास

भारताने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान ३ मोहीम राबवत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा विक्रम नोंदविला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश बनला.

मनी हाइस्टपासून प्रेरणा घेत अंमली पदार्थाची तस्करी; पोलिसांनी असं उघड केलं रॅकेट

सय्यद मुस्तफा कमाल यांनी संसदेत कराचीबद्दल बोलताना म्हटले, “कराचीमधून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पाकिस्तानची दोन मोठी बंदरे कराचीमध्ये आहेत. मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये प्रवास करण्यासाठी कराची हे मोक्याचे ठिकाण आहे. कराचीमधून पाकिस्तानला ६८ टक्के महसूल मिळतो. मात्र मागच्या १५ वर्षांत कराचीला स्वच्छ पाणीही देता आलेले नाही. कराची शहराला जो पाणीपुरवठा होतो, तोही पाणी माफियाकडून चोरला जातो. हाच चोरलेला पाणी साठा पुन्हा चढ्या दराने कराचीमधील लोकांना विकला जातो.”

कमाल पुढे म्हणाले की, पाकिस्तानमधील २६.२ दशलक्ष मुलं शाळेत जात नाहीत. ही संख्या जगातील ७० देशांमधील एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेले हे निरक्षर मुलं पाकिस्तानची होत असलेली आर्थिक प्रगती उध्वस्त करण्याची भीती आहे. एकट्या सिंध प्रांतात कागदावर ४८ हजार शाळा आहेत. मात्र त्यापैकी ११ हजार शाळा या कुठेही अस्तित्वात नाहीत. सिंध प्रांतातील ७० लाख मुळे शाळाबाह्य आहेत, असेही ते म्हटले.

“इस्रायलचे हल्ले निर्दयी, त्यांनी किमान…”; कर्नल वैभव काळे यांच्या मृत्यूनंतर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

युनिसेफच्या माहितीनुसार, पाकिस्तान हा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा शाळाबाह्य मुले असलेला देश आहे. पाकिस्तानमधील ५ ते १६ वर्ष वयोगटातील २२.८ दशलक्ष मुले शाळाबाह्य आहेत. याच वयोगटातील हे प्रमाण पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के इतके आहे.

पाकिस्तानचे ज्येष्ठ राजकारणी मौलाना फजलुर रहमान यांनी काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील आर्थिक असमानतेकडे लक्ष वेधले होते. त्याच्या काही दिवसानंतर सय्यद मुस्तफा कमाल यांची ही टिप्पणी समोर येत आहे. “भारत महसत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे आणि आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत”, असे मौलाना फजलुर रहमान म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India landed on moon but karachi open gutters were taking childrens lives pakistan lawmaker point kvg