पीटीआय, कुवेत शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले असून पहिल्या दिवशी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची भेट घेतली. अनिवासी भारतीयांनी जगाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. मोदी यांच्या सन्मानार्थ येथे शेख साद अल-अब्दुल्ला क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘हाला मोदी’ या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनिवासी भारतीयांनी गर्दी केली. यावेळी मोदी म्हणाले, कौशल्याच्या क्षेत्रामध्ये जगाची राजधानी होण्याची भारताची क्षमता आहे.

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Dr Pardeshi appointment as cms secretary revived old memories in Yavatmal and district is also expressing happiness
डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव होताच यवतमाळात आनंद

हेही वाचा >>>Robin Uthappa : भारताच्या माजी क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर तसेच प्रकाशन करणाऱ्या कुवेतमधील दोन नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही ग्रंथांच्या अरबी आवृत्त्यांच्या प्रतींवरही पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली. कुवेतचे श्रीमंत शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून मोदी कुवेतला गेले. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. ४३ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची कुवेतला ही पहिलीच भेट आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८१मध्ये कुवेतला गेल्या होत्या.

दरवर्षी शेकडो भारतीय कुवेतला येतात. तुम्ही कुवेती समाजामध्ये भारताचा ठसा उमटवला आहे. कुवेतमध्ये तुम्ही भारतीय कौशल्याचे रंग मिसळले आहेत. तुम्ही कुवेतमध्ये भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान आणि परंपरा घेऊन आला आहात. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Story img Loader