india sniper rifle .338 saber vs us barrett 50 cal : शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत भारत सातत्याने आपली शक्ती वाढवताना दिसत आहे. यादरम्यान नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG)ने गुरुवारी केंद्रीय आणि राज्य कमांडो विंग्सना हरवून अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेच्या स्नायपर प्रकारात विजय मिळवला आहे. या स्पर्धेत एनएसजीने बेंगळुरू येथील एसएसएस डिफेन्स (SSS Defence) कंपनीने बनवलेली .३३८ सेबर (.338 Saber) स्नायपर रायफल वापरली. भारतातील विविध कमांडो दलांनी जगभरातील सर्वोत्तम स्नायपर रायफल्ससह या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेत जगभरातील देशांमधील कमांडो वापरत असलेल्या टॉप स्नायपर रायफल्सचा वापर या स्पर्धेत करण्यात आला. मात्र .३३८ सेबरने केवळ अचूकतेने लक्ष्यच भेदले नाही तर स्नायपिंग स्पर्धेत इतर सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

महाराष्ट्र पोलिसांच्या फोर्स वनने स्पर्धेत दुसरे स्थान पटकवले. फोर्स वनने बॅरेट ५० कॅल (Barrett 50 Cal) ही अत्यंत शक्तिशाली अमेरिकन स्नायपर रायफल वापरली. ही रायफल जगातील सर्वोत्तम स्नायपिंग रायफल मानली जाते. इतकेच नाही तर अमेरिकन स्पेशल फोर्सेस आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) तैनात असलेल्या भारतीय सैन्याकडून देखील या रायफलचा वापर केला जातो. फोर्स वनने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.

यामध्ये विशेष काय आहे?

सेबर.३३८ ही एकमेव भारतात डिझाइन आणि निर्मिती केलेली स्नायपर रायफल आहे जी सर्वात प्रतिष्ठित .३३८ लपुआ मॅग्नम (.338 Lapua Magnum) या स्नायपर कॅलिबर्समध्ये उपलब्ध आहे. या रायफलची इफेक्टिव्ह रेंज ही जवळपास १,५०० मिटर इतकी आहे आणि हिची अचूकता सब १ मिनिट ऑफ अँगल एमओए (MoA) आहे ( MoA म्हणजे १०० मीटरवर ३ सेमी x ३ सेमीची ग्रुप साइज).

या रायफलमध्ये २७-इंच मॅच बॅरल (भारतीय बनावटीचे), मोनोलिथिक चेसिस २ स्टेज ट्रिगरसह , भारतात डिझाइन आणि तयार केलेल्या सप्रेसरशी सुसंगत सप्रेसर देण्यात आले आहे.

भारतातून दुसऱ्या देशांना निर्यात

एनएसजीकडे बॅरेट्ट एमआरएडी (Barrett MRAD) स्नायपर देखील आहे, पण त्यांनी एसएसएस डिफेन्सची रायफल वापरण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे एका देशाने यापूर्वी एसएसएस डिफेन्सकडू ही स्नायपर रायफल विकत घेतली आहे, तसेच पुढील ऑर्डर देखील दिली आहे. द प्रिंटने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. लष्कर आणि पोलीस दलांसाठी अनेक वर्षांपासून भारत लहान शस्त्रे आयात करत आला आहे. असे असताना भारताने दुसर्‍या देशाला रायफल निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.