रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याचा आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याचा आरोप करत अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र विभागाने १२ देशांतील ४०० कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला आहे. ही आतापर्यंत केलेली सर्वांत मोठी कारवाई मानली जाते आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारत सरकारकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे.

भारत सरकारची प्रतिक्रिया काय?

शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. “अमेरिकेने भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. मात्र, भारताकडे व्यापार धोरण-व्यापार नियंत्रणासंदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आम्ही त्याचे पालन करतो. याशिवाय भारत वासेनार व्यवस्था, ऑस्ट्रेलिया समूह आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचाही सदस्य आहे. तसेच आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचेही पालन करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
On the occasion of Pune Diwali the traffic police banned four wheelers in the central area
पुणे: मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी
nia begins investigation in ganderbal terror attack search operations Jammu and Kashmir
काश्मीरमध्ये एनआयएकडून तपास सुरू; सुरक्षा दलांची शोधमोहीम; देशभरात संतप्त प्रतिक्रिया
bank employees angry over ladki bahin scheme warning of strike during election period
लाडकी बहीण’वरून बँक कर्मचारी संतप्त; ऐन निवडणूक काळात संपाचा इशारा
Maharashtra State Government approves interest subsidy for sugar mills print politics news
मातब्बर विरोधक सरकारचे ‘लाभार्थी’; जयंत पाटील, थोरात, देशमुख, कदम यांच्या कारखान्यांना व्याज अनुदान
co operative sector is important for developed india says ex union minister suresh prabhu
विकसित भारतासाठी सहकार क्षेत्र का महत्वाचे? माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं कारण…
navi Mumbai police commissioner
पनवेल: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्तांचे बदलीशस्त्र

हेही वाचा – Daylight Saving Time : ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय? जगभरात का होते चर्चा? जाणून घ्या कारण!

“या कंपन्या भारतातील कायद्याचं उल्लंघन करत नाही”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमच्या माहितीनुसार ज्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यापैकी कोणतीही कंपनी भारतात कायद्याचे उल्लंघन करत नाही. मात्र, तरीही अमेरिकेच्या आरोपानंतर आम्ही संबंधित विभागाच्या संपर्कात आहोत. तसेच आम्ही अमेरिकेतील अधिकाऱ्यांशीही यासंदर्भात चर्चा करतो आहे.”

“निर्बंधांचा आमच्यावर कोणताही परिणाम नाही”

याशिवाय अमेरिकेने ज्या कंपनींवर निर्बंध लावले त्यापैकी एक असलेल्या श्रीजी इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनेही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “आम्ही भारतातील कायद्यानुसार काम करतो आहे. अमेरिकेने आमच्यावर निर्बंध का लादले, याबाबत कल्पना नाही. या निर्बंधांचा आमच्या व्यापारावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण आम्ही अमेरिकेकडून कोणतीही निर्यात किंवा आयात करत नाही”, असं त्यांनी सांगितलं.

“आम्ही रशियाशी व्यापार सुरु ठेवू”

आणखी एक कंपनी टीएसएमडी ग्लोबलचे संचालक म्हणाले, “आमच्यावर हे निर्बंध का लादले, याबाबत माहिती नाही. आम्ही ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही अमेरिकेशी कोणताही व्यापार करत नाही. त्यामुळे या निर्बंधांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही नियमानुसार रशियाबरोबर व्यापर करतो आणि तो यापुढेही तसाच सुरू राहील.”

प्रतिबंधित भारतीय कंपन्या कोणत्या?

मुंबईमध्ये मुख्यालय असलेली श्रेया लाईफ सायन्सेस प्रा. लि. ही कंपनी २०२३पासून अमेरिकन नाममुद्रा असलेले तंत्रज्ञान रशियाला देत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. कोल्हापुरातील खुशबू हॉनिंग आणि नवी मुंबईतील दिघा येथील शार्पलाइन ऑटोमेशन या राज्यातील कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तमिळनाडूतील ‘फुट्रेव्हो’ नावाची कंपनी रशियाला ओर्लान ड्रोनच्या निर्मितीसाठी उच्च तंत्रज्ञान पुरवीत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा – Donald Trump Wishes For Diwali : “मोदी आमचे चांगले मित्र, हिंदूंचं संरक्षण करू”, दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आश्वासन!

याखेरीज आभार टेक्नोलॉजी अँड सर्व्हिसेस, बंगळूरु; असेंड एव्हिएशन, दिल्ली; डेन्वास सर्व्हिसेस, नवी दिल्ली; एम्सिटेक, बंगळूरु; गॅलेक्झी बेअरिंग्ज, अहमदाबाद; इनोव्हिओ व्हेंचर्स, गुडगाव; केडीजी इंजिनीअरिंग, दिल्ली; लोकेश मशिन्स लि., हैदराबाद; मास्क ट्रान्स, चेन्नई; ऑर्बिट फिनट्रेड, राजकोट, गुजरात; पायोनिअर इलेक्ट्रॉनिक्स, नवी दिल्ली आणि आरआरजी इंजिनीअरिंग टेक्नोलॉजीज, हैदराबाद; शौर्य एअरोनॉटिक्स, दिल्ली; श्रीजी इम्पेक्स, मेरठ आणि टीएमएसडी ग्लोबल, नवी दिल्ली या कंपन्या तसेच नवी दिल्लीतील सुधीर कुमार आणि छत्तीसगडमधील विवेककुमार मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.