आपल्या देशाला लुटारू राजपुत्राची नाही तर एका सक्षम चौकीदाराची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते कार्य सक्षमपणे करत आहेत. यापुढेही ते जिंकून येतील आणि पुन्हा एकदा देश सांभाळतील. देशाला त्यांच्यासारख्या चौकीदाराची गरज आहे असं मत विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच विराजमान होतील याची मला खात्री आहे असं मत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं आहे. अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी सात जागा मोदींनाच या मोहीमेत सहभाग नोंदवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मत विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं आहे. भारताचा इतिहास आहे, ज्यावेळी आपल्या देशावर एखाद्या राजपुत्राने राज्य करण्याचा प्रयत्न केला, एखाद्या विदेशी नागरिकाने राज्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हा देश लुटला असाही आरोप विवेक ओबेरॉय यांनी म्हटले आहे.

मात्र आपल्या देशाला देश लुटणारा राजपुत्र नको, देश सांभाळणारा चौकीदार हवा आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे पंतप्रधानपदी कोणताही राजपुत्र नाही तर चौकीदार नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा विश्वास वाटतो आहे असंही मत विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं आहे. आता भारत कुणा राजपुत्राच्या हाती देऊन लुटला जावा अशी कुणाचीही इच्छा नाही. पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील आणि एक चौकीदार म्हणून देश सांभाळतील असं मत विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India need chaukidar not any prince says vivek oberoi