वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने चीनशी वास्तवाच्या आधारेच व्यवहार केले पाहिजेत. उभय देशांतील संबंध हे परस्पर सामंजस्यासह आदर, संवेदनशीलता आणि हितरक्षणावर आधारित असावेत, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.चीनसह भारताच्या असलेल्या संबंधांचा उहापोह करताना जयशंकर म्हणाले, की चीनच्या आक्रमक हालचालींना रोखण्यासाठी वास्तववादाची कास सोडता कामा नये. त्यांनी नेहरूंच्या काळाप्रमाणे चीनशी हळवे भावनिक संबंधांची शक्यता झटकून टाकली.

जयशंकर म्हणाले, की मी चीनशी संबंधांबाबत वास्तववादी तत्त्वाचे समर्थन करतो. त्या संबंधांत तणाव असतो. मात्र सरदार पटेलांपासून नरेंद्र मोदींपर्यंत तणावपूर्ण वास्तववादाचा अवलंब केल्याने आपल्याला निश्चित-ठोस दृष्टिकोन लाभतो. ते म्हणाले, की मोदी सरकारचा यावर मोठा भर असून, या धोरणात सातत्य ठेवले आहे. या धोरणात वास्तववादाचा प्रवाह असून, त्याचा उगम सरदार पटेल यांच्यापासून झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India needs to deal with china only on the basis of reality amy
Show comments