Gurpatwant Singh Pannun Assassination Plot : खलिस्तानवादी आणि अमेरिकन नागरिक असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेले भारतीय नागरिक निखिल गुप्ता सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. त्यांचे सात महिन्यांपूर्वी चेक प्रजासत्ताकमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले होते. दरम्यान या सात महिन्यात कुटुंबीयांनी अनेक वेळा विनंत्या करूनही केंद्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला नसल्याचे निखिल गुप्ता यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावर बोलताना निखिल गुप्ता म्हणाले, “मला प्रागहून अमेरिकेत प्रत्यार्पित केल्यापासून कोणतीही कायदेशीर मदत मिळालेली नाही. या काळात भारतीय दूतावासातून कोणीही माझी भेट घेतली नाही. माझ्या कुटुंबाने त्यासाठी अनेक विनंत्या केल्या, पण आजपर्यंत कोणीही माझी भेट घेतलेली नाही.”

निखिल गुप्ता सध्या न्यू यॉर्कच्या ब्रुकलिनमधील मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये आहेत. गुप्ता यांना द इंडियन एक्सप्रेसने काही प्रश्न विचारले होते. त्यांच्याशी नियमित संपर्कात असलेल्या एका मध्यस्थाद्वारे त्यांनी ही उत्तरे दिली आहेत. निखिल गुप्ता यांनी सांगितले की, “त्यांच्या कुटुंबाने परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना ईमेल लिहिले होते परंतु त्यांना कोणीही भेटले नाही.”

निखिल गुप्ता यापूर्वी प्रागमध्ये जवळजवळ एक वर्षाच्या तुरुंगात होते. त्यावेळी त्यांना तीनदा भारताकडून कायदेशीर मदत मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा : गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

२०२३ च्या अखेरीस, गुप्ता यांच्या कुटुंबाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे संवेदनशील प्रकरण असल्याचे म्हणत याचिका फेटाळून लावली होते. तसेच याबाबत सरकारने कारवाई करावी, असे म्हटले होते.

यावेळी गुप्ता यांनी, पन्नूनच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सहआरोपी असलेल्या विकास यादवशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिकेने सादर केलेले पुरावेही बनावट असल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा : Supreme Court : वयाच्या १४ वर्षी केलेल्या गुन्ह्यात व्यक्तीची २९ वर्षांनंतर सुटका; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

जून २०२३ मध्ये अटक

भारतातून चेक प्रजासत्ताकाला जाताना निखिल गुप्ता यांना अमेरिकन सरकारच्या विनंतीनंतर जून २०२३ मध्ये अटक करण्यात आले होते. निखिल गुप्ता यांच्यावर खलीस्तानी फुटीरतावादी आणि अमेरिकन नागरिक असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. ते सध्या न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन डिटेंन्शन सेंटरमध्ये आहेत.

Live Updates