अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकलं आहे. स्वीडिश थिंक-टँकच्या अहवालानुसार जानेवारी २०२४ पर्यंत भारताकडे १७२ अण्वस्त्रे होती. तर पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची संख्या १७० इतकी आहे. या अहवालात दावा केला आहे की भारताने २०२३ मध्ये नव्या अण्वस्त्रांची निर्मिती करून आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या वाढवली आहे. दुसऱ्या बाजूला चीननेही त्यांच्या अणू कार्यक्रमात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत त्यांच्याकडे ५०० अण्वस्त्र होती. तसेच चीनने पहिल्यांदाच त्यांची हाय ऑपरेशनल शस्त्रे अलर्ट मोडवर ठेवली आहे. जानेवारी २०२३ पर्यंत चीनकडे ४१० आण्विक शस्त्रं होती, जी आता ९० ने वाढली आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटच्या (SIPRI) अहवालानुसार भारत, चीन, पाकिस्तानसह जगभरातील एकूण नऊ देशांकडे आण्विक शस्त्रं आहेत. अण्वस्त्रधारी देशांचं अण्वस्त्रांवरील अवलंबित्व वाढत चाललं आहे. या अहवालात म्हटलं आहे की, ज्या ज्या देशांकडे अण्वस्त्रं आहेत ते देश त्यांच्याकडील आण्विक शस्त्रं अत्याधुनिक करत आहेत. अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या देशांमधील सरकारे यावर अधिक लक्ष देत आहेत. भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि इस्रायल या देशांकडे अण्वस्त्रं आहेत.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

जगभरात जितकी अण्वस्त्रे आहेत त्यापैकी ९० टक्के केवळ अमेरिका आणि रशियाकडे आहेत. उर्वरित १० टक्के अण्वस्त्रे इतर सात देशांकडे आहेत. २०२३ मध्ये अनेक देशांनी आण्विक सक्षम शस्त्रे तैनात केली आहेत. याबाबतीतही रशिया आणि अमेरिका हे देश आघाडीवर आहेत. जगभरात तयार करण्यात आलेल्या १२,१२१ अण्वस्त्रांपैकी जवळजवळ ९,५८५ अण्वस्त्र संभाव्य वापरासाठी सैन्याच्या शस्त्रागारात ठेवण्यात आली आहेत.

हे ही वाचा >> खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अमेरिकेत सुनावणी, निखिल गुप्ताने सर्व आरोप फेटाळले

या अहवालानुसार, चीन हा देश सर्वात वेगाने त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण करत आहे. चीनने अधिकाधिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ९० नवी आण्विक शस्त्रे तयार केली आहेत. या दशकाच्या अखेरपर्यंत त्यांना रशिया आणि अमेरिकेची बरोबरी करायची असल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या घडीला रशिया आणि अमेरिकेकडे चीनच्या अनेक पटींनी अधिक आण्विक शस्त्रं आहेत. अमेरिकेकडे चीनच्या सात पट तर रशियाकडे आठ पट अधिक आण्विक शस्त्रं आहेत.

देशअण्वस्त्रांची संख्या
रशिया४,३८०
अमेरिका३,७६०
चीन५००
फ्रान्स२९०
ब्रिटन२२५
भारत१७२
पाकिस्तान१७०
इस्रायल९०
उत्तर कोरिया५०

दरम्यान, चीन एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत मारा करता येईल अशी बॅलेस्टिक क्षेपणास्रे तयार करत आहे. चीन त्यांच्या शस्त्रागाराच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च करत आहे.