पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानने आण्विक आस्थापनांची यादी परस्परांना दिली आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. आण्विक केंद्रांवर हल्ले करू नये, यासाठी दोन्ही देश गेल्या तीन दशकांपासून ही यादी परस्परांना देतात. तसा करार दोन्ही देशांत झाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की राजनैतिक माध्यमातून भारत आणि पाकिस्तानने बुधवारी आण्विक आस्थापनांची यादी परस्परांना दिली. या आस्थापनांवर आणि आण्विक केंद्रांवर करारानुसार हल्ला करण्यास प्रतिबंध आहे. हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला. २७ जानेवारी १९९१पासून कराराची अंमलबजावणी होत आहे.

pm crop insurance scheme
शेतकऱ्यांना दिलासा; खतावरील अनुदान कायम, पंतप्रधान पीक विमा योजनेला बळ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Rajnath singh loksatta news
संरक्षण दलांसाठी २०२५ हे ‘सुधारणा वर्ष’, सशस्त्र दले अधिक सुसज्ज, अत्याधुनिक करणार
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Aligarh Muslim University Minority Status
AMU Minority Status Case: अलीगढ मुस्लीम विद्यापीठ ही अल्पसंख्यांक संस्था? न्या. चंद्रचूड यांनी शेवटच्या दिवशी दिला महत्त्वाचा निकाल
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
honey extension scam
Honey Scam Controversy : लोकांना बेस्ट कूपन कोड शोधून देणार्‍या ‘हनी’वर गंभीर आरोप; युट्यूबरच्या दाव्याने खळबळ
Image of Blinkit's ambulance or a related graphic.
Blinkit Ambulance : ‘१० मिनिटांत अँम्बुलन्स’, ब्लिंकिट आता पुरवणार रुग्णवाहिका सेवा; जाणून घ्या किती असणार शुल्क?

हेही वाचा : संरक्षण दलांसाठी २०२५ हे ‘सुधारणा वर्ष’, सशस्त्र दले अधिक सुसज्ज, अत्याधुनिक करणार

‘भारतीय मच्छिमारांची सुटका करावी’

पाकिस्तानात तुरुंगवासाच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झालेल्या १८३ भारतीय मच्छिमार आणि सामान्य नागरिकांची सुटका करावी, अशी विनंती भारताने बुधवारी केली. तसेच, १८ नागरिक आणि मच्छिमारांना भेटण्यासाठी भारताच्या वकिलातीला परवानगी द्यावी, अशीही विनंती भारताने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. दर वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देशांत तुरुंगवासात असलेल्या नागरिकांची यादी परस्परांना दिली जाते. २००८ मध्ये हा करार झाला. भारताने ३८१ नागरिकांची आणि ८१ मच्छिमारांची यादी पाकिस्तानकडे दिली, तर पाकिस्तानने ४९ नागरिक आणि २१७ मच्छिमारांची यादी दिली.

Story img Loader