भारताला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मिळून म्हणजेच कलम ३७० हटवून तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. काश्मीरप्रश्नाबाबत जगातील इतर देश पाठिंबा देतील किंवा न देतील, पण चीन नक्कीच देईल, अशी पाकिस्तानला आशा आहे. भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा, असे आवाहन चीनने केले आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केले. भारतीय संविधानाच्या कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारत सरकारने त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

हेही वाचा- ‘भाजपा खासदारांनी त्यांच्या पत्नींना…’; बद्रुद्दीन अजमल यांचा मोदी सरकारवर निशाणा

चीनचे भारत-पाकिस्तानला आवाहन

भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीरचा प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे. काश्मीरच्या मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे. तीन वर्षांपूर्वी चीनने भारत आणि पाकिस्ताने संयम आणि समजूतदारपणा दाखवत परिस्थिती बिघडेल किंवा तणाव वाढेल अशी कोणतीही कारवाई नये. आजूबाजूच्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा करुन वाद सोडवण्याचे आवाहन चीनने केले आहे.

हेही वाचा- अमेरिकेबरोबरच्या विविध चर्चा चीनकडून स्थगित; पलोसी यांच्या तैवान दौऱ्याचे पडसाद 

चीनच्या आवाहनला भारताचे प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरशी संबंधित प्रश्न हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मार्चमध्ये म्हटले होते की, ‘चीनसह इतर कोणत्याही देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader