न्यू यॉर्क : अमेरिकेत  चार व्यक्तींना गंभीर जंतुसंसर्ग होण्यास अ‍ॅरोमाथेरपीमध्ये वापरले जाणारे अत्तर कारणीभूत ठरल्याचा दावा येथील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) केला असून या अत्तराची आयात भारतातून करण्यात आली आहे. यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू ओढवला असून त्यात एका मुलाचा समावेश आहे.

भारतात निर्माण केलेल्या या अत्तराच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात विशिष्ट रोगाचा प्रसार करणारे जिवाणू आढळल्याने बाजारातून हे उत्पादन मागे घेण्याची कार्यवाही सुरू आहे. संसर्ग झालेल्या या चारही व्यक्तींनी कधीही देशाबाहेर प्रवास केलेला नाही.  या व्यक्ती जॉर्जिया, कन्सास, मिनेसोटा आणि टेक्सास या प्रांतातील आहेत.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार मेलिओआयडोसिस या रोगाला कारणीभूत ठरणारे जिवाणू या अत्तराच्या कुपीत सापडले आहेत. ही कुपी एका रुग्णाच्या घरात सापडली. तीमध्ये सापडलेले जिवाणू हे दक्षिण आ़िशयात आढळून येणाऱ्या जिवाणूंच्या प्रवर्गातील आहेत. या अत्तरात लॅव्हेंडर आणि चॅमोमाईल तेलाचा वापर करण्यात आला आहे.

Story img Loader