‘‘माझ्या भविष्यकालीन योजनांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी व्यक्तिश भेटीत त्यांचे अभिनंदन केल्यानंतर ते बोलत होते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी सहा नोव्हेंबरला फेरनिवड झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांची येथे प्रत्यक्ष भेट झाली. पूर्व आशिया शिखर परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. त्यांची दिवसभरात तीनदा समोरासमोर भेट झाली. त्यांचे अभिनंदन करताना मनमोहनसिंग यांनी त्यांच्यातील मैत्री आणि सहकार्य यापुढेही चालू राहील तसेच द्विपक्षीय पातळीवरील संबंध अधिक बळकट होतील, असा आशावाद व्यक्त केला. त्याला ओबामा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टॉम डॉनिलॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत दीड तास चर्चा केली. ही चर्चा परस्परांच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त झाली, असे सूत्रांनी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा