पीटीआय, नवी दिल्ली : विकास, आरोग्य व पर्यावरणासारख्या क्षेत्रांत भारताच्या प्रगतीची प्रशंसा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी शनिवारी केली. ‘विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली जाते, तेव्हा काय काय होऊ शकते,’ याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’चे सह अध्यक्ष बिल गेट्स यांनी सुरक्षित, प्रभावी व किफायतशीर लसनिर्मिती करण्याच्या भारताच्या अभूतपूर्व क्षमतेची प्रशंसा केली. यातील बहुसंख्य लसमात्रा विकसित करण्यासाठी ‘गेट्स फाउंडेशन’ने सहाय्य केले आहे. गेट्स म्हणाले, की या लसमात्रांमुळे करोना महासाथीत लाखो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. तसेच जगभरात इतर आजारांचाही प्रादुर्भाव रोखण्यास भारताने विकसित केलेल्या लशींमुळे मोठी मदत झाली आहे.

गेट्स यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. मोदींनी शनिवारी केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की बिल गेट्स यांना भेटून व त्यांच्याशी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करून आनंद वाटला. आपल्या वसुंधरेला अधिक सुंदर आणि त्याच्या शाश्वत अस्तित्वासाठी गेट्स यांची बांधिलकी, झपाटलेपण आणि त्यांची विनम्रता भावते.

‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा सरकारकडून प्रभावी वापर!’

गेट्स यांनी नमूद केले, की महासाथीच्या काळात भारताने २० कोटी महिलांसह ३० कोटी नागरिकांना आपत्कालीन ‘डिजिटल पेमेंट’ केले. हे केवळ शक्य झाले कारण भारताने ‘आधार’सारख्या ‘डिजिटल आयडी प्रणाली’मध्ये गुंतवणूक करून ‘डिजिटल बँकिंग’साठी नाविन्यपूर्ण व्यासपीठ तयार केले. त्याद्वारे आर्थिक व्यवहारातील सहभागास प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तम आर्थिक गुंतवणूक होण्यास मदत झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India progress bill gates development health innovative investments in various sectors ysh