पीटीआय, नवी दिल्ली
भारत-चीन यांच्यात गस्तकरार झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने पावले उचलली जात असतानाच चीनने आपली कुरापतखोर भूमिका कायम ठेवली आहे. चीनच्या होटन प्रांतात दोन नवे परगणे तयार करण्यात येत असून या परगण्यांमध्ये भारताच्या लडाख प्रांतातील काही भाग दर्शविण्यात आला आहे. तसेच ब्रह्मपुत्रेवर मोठे धरण बांधण्यात येत असून या दोन्ही कृतींवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.

चीनच्या नव्या परगण्यांच्या निर्मितीचा भारताच्या क्षेत्रावरील सार्वभौमत्वाबाबतच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण भूमिकेवर परिणाम होणार नाही. चीनची विस्तारवादी भूमिका चुकीची असून त्यांच्या बेकायदा आणि जबरदस्तीने कब्जा करण्याच्या पद्धतीला वैधता मिळणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी निषेध व्यक्त केला. भारतीय भूभागावरील चीनचा बेकायदा ताबा भारताने कधीही स्वीकारलेला नाही. आम्ही मुत्सद्दी माध्यमांद्वारे चीनकडे गंभीर निषेध नोंदविला आहे, असेही जैस्वाल यांनी सांगितले.

Rajasthan Woman Anita Chaudhary Murder
Rajasthan Woman Murder: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले सहा तुकडे, आरोपी गुल मोहम्मदचा शोध सुरू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
Aditya Thackeray News
Big Fight In Worli : वरळीचा पेपर आदित्य ठाकरेंसाठी कठीण? संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरांना द्यावी लागणार टक्कर
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला
Lawrence Bishnoi gang
प्रत्येक गुन्ह्यासाठी नवीन तरुण… किशोरवयीनांचा वाढता वापर… लॉरेन्स बिष्णोई टोळी कशी ठरतेय दाऊद, गवळी, नाईक टोळ्यांपेक्षा घातक?
aam aadmi party is disaster
आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा : आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र

ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेवर भारताने आक्षेप घेतल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. चीनच्या या कृतीकडे भारत देखरेख ठेवेल आणि आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल, असे जैस्वाल म्हणाले. चीनच्या नव्या धरणामुळे आसामसह ईशान्य भारतातील काही राज्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या राज्यांच्या हितांना धरणामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही जैस्वाल यांनी दिली.

हेही वाचा : चीनमध्ये पसरत असलेल्या HMPV विषाणूचा भारताला धोका आहे का? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

चीनच्या होटन प्रांतातील दोन नवीन परगण्यांच्या स्थापनेशी संबंधित घोषणांबाबत माहिती मिळाली आहे. या तथाकथित परगण्यांच्या अधिकारक्षेत्रातील काही भाग भारताच्या केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये येतो. भारतीय भूभागावर चीनचा बेकायदा कब्जा कधीही मान्य केला जाणार नाही. – रणधीर जैस्वाल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

Story img Loader