अमेरिकेनं दिलेल्या एका अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख ‘आझाद कश्मीर’ असा करण्यात आला आहे, ज्याचा भारतानं कडाडून निषेध केला आहे. १९ जुलै रोजी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं एक अहवाल सादर केला आहे. ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेरिरिझम’ असं या अहवालाचं नाव आहे. याच अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या अहवालाची माहिती जेव्हा भारताला मिळाली त्यानंतर भारतानं अमेरिकेच्या या अहवालाचा कडाडून निषेध केला आहे. तसंच अमेरिकेला यासंदर्भातली जाणीव करून दिल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं आहे की जम्मू काश्मीरचा उल्लेख करताना आमच्याकडून ‘आझाद कश्मीर’ असा उल्लेख झाला आहे. अमेरिका आजवर पाकव्याप्त काश्मीर असाच उल्लेख करत आली आहे. मात्र आझाद कश्मीर असा उल्लेख पहिल्यांदाच झाला असल्याचं अमेरिकेनं मान्य केलं आहे.

काश्मीरबाबत आमचं धोरण अजिबात बदललेलं नाही असंही अमेरिकेनं ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे. काश्मीर प्रश्नासंबंधीची चर्चा आणि यासंदर्भात भारत-पाकिस्तानचे संबंध यासाठी दोन्ही देशांकडून जर सकारात्मक पावलं उचलली गेली तर आम्ही त्याचं स्वागतच करू असंही अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीर यावरून आझाद कश्मीर असा उल्लेख अमेरिकेनं का केला? याचं उत्तर तूर्तास तरी त्यांच्याकडे नाही मात्र

आपल्या अहवालात अमेरिकेनं हरकत उल मुजाहिद्दीनचा उल्लेख केला आहे. ही संघटना भारत, जम्मू काश्मीर आणि अफगाणिस्तान या ठिकाणी कारवाया करण्यात अग्रेसर आहे असंही यात नमूद करण्यात आलं आहे. हाफिज सईद याच्या दहशतवादी संघटना नेमक्या किती आहेत याची संख्या नेमकी सांगता येत नाही मात्र पाकव्याप्त काश्मीर, पंजाब, खैबर आणि जम्मू काश्मीरमध्ये हाफिजच्या संघटनेचे बहुतांश सदस्य आहेत अशीही माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. शुक्रवारीच पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी देण्यात येणारा निधी रोखला.. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बातमी आली आहे.

Story img Loader