अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातर्फे ज्या देशांचा माग काढला जातो, त्यांच्यावर पाळत ठेवली जाते, त्यांच्या हालचाली सूक्ष्मपणे टिपल्या जातात, अशा देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. लंडनच्या द गार्डियन या वृत्तपत्रास एडविन स्नोडेन नावाच्या सीआयएच्या २९ वर्षीय माजी अधिकाऱ्याने दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या गुप्त टेहळणी यंत्रणेचा पर्दाफाश करण्यात आला.
काय होता हा गुप्त टेहळणी कार्यक्रम
जगभरातील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर ‘नजर’ ठेवणारा एक ‘संगणक प्रोग्राम’ अमेरिकेने विकसित केला आहे. ‘बाऊंडलेस इन्फर्ॉमट’ या नावाने ओळखली जाणारी प्रणाली अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरीटी एजन्सीतर्फे वापरली जाते. ही प्रणाली दूरध्वनी आणि संगणकाच्या जाळ्यातील सर्व माहिती संकलित करते.
याबाबत लंडन येथील गार्डियन या वृत्तपत्राने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले आहे. केवळ २०१३ च्या मार्च महिन्यात, जगभरातील संगणक नेटवर्कच्या माध्यमातून ९७ अब्ज माहितीचे तुकडे साठविण्यात आले आहेत, असे नॅशनल सीक्रेट एजन्सीच्या ‘ग्लोबल हीट मॅप’ या नावाने साठविण्यात आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
या माहितीचे पृथक्करण केले असता यापैकी १४ अब्ज तुकडे हे इराणशी संबंधित असल्याचे, १३.५ अब्ज तुकडे पाकिस्तानविषयीच्या माहितीचे तर, जॉर्डन या अमेरिकेच्या मित्र राष्ट्राबाबत माहितीचे १२.५ अब्ज तुकडे साठविण्यात आले आहेत. त्यानंतर इजिप्तबाबत ७.६ अब्ज आणि भारताबाबत ६.३ अब्ज माहितीचे तुकडे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने संकलित केले आहेत.
बाऊंडलेस इन्फरॉमट प्रोग्रामवरील ग्लोबल हीट मॅपवर असलेल्या देशांवर क्लिक केले असता, त्या त्या देशाची माहिती सांगणाऱ्या एकूण किती संगणकीय संचिका उपलब्ध आहेत, हे स्पष्ट होते. या नकाशात ‘रंग पद्धतीचा’ वापर केला गेला आहे. एनएसएकडून कोणत्या राष्ट्रावर किती ‘नजर’ ठेवली जाते यावर त्या देशाचा ‘ग्लोबल हीट मॅप’वरील रंग अवलंबून असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा