पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या पंक्तीत बसला हिंदुस्तान

तंत्रज्ञान, प्रगती आणि विकासाच्या यादीमध्ये महासत्ता बनत अमेरिका-चीनशी टक्कर देणारा भारत सर्वाधिक दहशतवादग्रस्त देशांच्या यादीमध्येही पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०११ सालात दहशतवादाच्या छायेखाली वावरणाऱ्या राष्ट्रांबाबत करण्यात आलेल्या जागतिक पाहणीमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या पंक्तीमध्ये भारतही जाऊन बसला आहे. २००३ सालच्या इराक युद्धानंतर दहशतवादाचे प्रमाण चार पटींनी वाढले असल्याचे अभ्यासातील निष्कर्ष आहेत. मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये १५८ राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्याच्या अहवालाद्वारे हा अभ्यास करण्यात आला.
२००२ ते २००९ या काळामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या स्वरूपावरून काढण्यात आलेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये (ग्लोबल टेररिझम इण्डेक्स) पाकिस्तान (१२ टक्के), अफगाणिस्तान (११ टक्के) आणि भारत (१० टक्के) इतका काढण्यात आला. २०११ साली मध्य आशिया, भारत, पाकिस्तान आणि रशिया या राष्ट्रांना दहशतवादाचे तडाखे सर्वाधिक बसले. २००७ सालाहून मात्र या हल्ल्यांमधील जीवितहानीमध्ये घट झाली. अतिरेकी हल्ल्यांनी जगभरात २०११ साली ७४७३ मृत्युमुखी पडले.     

काय म्हणतो अभ्यास?
अमेरिकेवर ९/११चा हल्ला झाल्यानंतर प्रत्येक वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली असून जागतिक स्तरावर प्रचंड मोठा परिणाम त्यामुळे झाला आहे. इराकवर लादलेले युद्ध हेच दहशतवादाचे मूळ कारण आहे. या युद्धामुळे अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाची मुळे आणखी रोवली गेली. दहशतवादामुळे होणारी जीवितहानी संख्या घसरली असली, तरी इराकमध्ये २०११ सालात दहशतवादाने जेरीस आणले. अमेरिका, अल्जेरिया आणि कोलंबिया या राष्ट्रांवरची दहशतवादाची छाया गेल्या दहा वर्षांमध्ये ओसरत गेली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये दहशतवादाचे अक्राळविक्राळ स्वरूप दिसले नसले, तरी तो भयावह स्थितीमध्ये अस्तित्वात असल्याचे ‘इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीस’ या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष स्टीव्ह किलेलिआ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या संस्थेद्वारेच दहशतवाद निर्देशांक मोजणी केली जाते.

काय आहे दहशतवादाचे रूप?
९/११नंतर दहशतवादी हल्ल्यांमधील मृत्यूच्या प्रमाणात १९५ टक्क्य़ांची वाढ झाली असून दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४६० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. अभ्यास करण्यात आलेल्या १५८ राष्ट्रांपैकी ३१ राष्ट्रांना २००१ नंतर कोणत्याही दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले नाही. उत्तर अमेरिकेला पश्चिम युरोपहून कमी दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले. अमेरिकेने २००१ नंतर दहशतवादाविरोधात उचललेल्या पावलांमुळे निर्देशांकाच्या दृष्टीने तो पहिल्या स्थानावरून थेट ४१ व्या स्थानी पोहोचला आहे.  

Story img Loader