पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘युक्रेन संघर्षांवर तोडगा काढून येथे शांतता प्रस्थापनेच्या प्रक्रियेत योगदान देण्यासाठी भारताची सदैव तयारी आहे,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी दिली. भारत दौऱ्यावर आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मोदी म्हणाले, की युक्रेनच्या संघर्षांला सुरुवात झाल्यापासून केवळ संवाद आणि मुत्सद्दगिरीच्या मार्गाने या वादावर तोडगा काढता येऊ शकतो, असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. यासाठीच्या शांतता प्रक्रियेत योगदान देण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे. यावेळी मेलोनी यांनी विश्वास व्यक्त केला, की ‘जी-२०’ गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत-युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीची प्रक्रिया सुलभ बनवून या प्रश्नी संवाद घडवण्यासाठी मध्यवर्ती भूमिका निभावेल.
मोदींनी सांगितले, की त्यांनी व मेलोनी यांनी युक्रेन संघर्षांच्या विकसनशील राष्ट्रांवर पडत असलेल्या प्रतिकूल प्रभावावर चिंता व्यक्त केली. या संघर्षांमुळे खाद्य, खते, इंधन संकट निर्माण झाले आहे. आम्ही या चर्चेत या मुद्दय़ांवर वाटत असलेली चिंता व्यक्त केली. या समस्यांवर मात करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर आमची सहमती झाली. नवी दिल्लीत ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत असताना मोदींनी युक्रेनसंघर्षांवर भाष्य केले आहे.
भारत-इटलीत संरक्षण सहकार्याचा नवा अध्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले, की भारत व इटलीने संरक्षण सहकार्याचा नवा अध्याय सुरू करताना त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना व्यूहात्मक भागीदारी दृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याशी व्यापक चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, की सह उत्पादन व सह विकासाच्या क्षेत्रात भारतात नवीन संधी निर्माण होत आहेत. त्या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरतील. भारत-इटलीच्या द्विपक्षीय संबंधांचा ७५ वा वर्धापनदिन यंदा साजरा होत आहे. भारत व इटलीने दोन्ही देशांच्या संरक्षण दलांत नियमित संयुक्त सराव व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारत-इटली खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
जयशंकर- ब्लिंकन यांची द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा
- भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि युक्रेनमधील संघर्षांसह महत्त्वाच्या जागतिक मुद्दय़ांवर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
- भारताने राष्ट्रीय राजधानीत आयोजित केलेल्या जी-२० परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेनिमित्त ही बैठक झाली. ‘जी-२० परराष्ट्रमंत्री परिषदेनिमित्त अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना भेटून आनंद झाला. द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि जागतिक मुद्दय़ांवर चर्चा करण्याची संधी मिळाली’, असे जयशंकर म्हणाले.
- जी-२० परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेला हजर राहण्यासाठी ब्लिंकन हे बुधवरी रात्री दिल्लीत येऊन पोहोचले. युक्रेन संघर्षांवरून पाश्चिमात्य देश आणि रशिया-चीन आघाडी यांच्यात दरी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यानंतर शुक्रवारी ब्लिंकन हे ‘क्वाड’ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीलाही हजर राहणार आहेत.