Shaikh Hasina Extradition : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांचं बांगलादेशात प्रत्यार्पण करण्यासाठी नोबल पारितोषिक विजेते महम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली बांग्लादेश सरकारकडून अधिकृत विनंती आली आहे. याबाबत भारताने सोमवारी माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत खुलासा केला. तसंच, याबाबत अद्याप भारताने कोणतीही प्रतिक्रिया कळवली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

“बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाकडून आम्हाला प्रत्यार्पणासंदर्भात विनंती प्राप्त झाली आहे. पण आम्ही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया कळवलेली नाही”, असं एमईएचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा >> अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…

शेख हसीना यांंच्याविरोधात अटक वॉरंट

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री तौहीद हुसैन यांनी ढाका येथील त्यांच्या कार्यालयात एक दिवस आधीच सांगितलं की देशाने हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक राजकीय नोट पाठवली आहे. ढाकास्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) ने हसीना आणि अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांविरोधात “मानवता आणि नरसंहाराविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी” अटक वॉरंट जारी केले आहे.

गृह सल्लागार जहांगीर आलम म्हणाले, “ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार आधीच अस्तित्वात आहे आणि या करारानुसार हसीना यांना बांगलादेशात परत आणले जाऊ शकते.”

शेख हसीना ५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी आणि लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर देशातून पळून आल्यापासून भारतात राहत आहे.

Story img Loader