भारतात पुन्हा एकदा करोना संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. देशभरात मागील २४ तासांत ७ हजार २४० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. एवढेच नाही तर सध्या देशभरात ३२,४९८ अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, यापैकी गंभीर आजारी लोकांची संख्या खूपच कमी आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांच्या कालावधीत ३ हजार ५९१ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, यादरम्यान ८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीनंतर महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. यात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसतान दिसत आहे. येथे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत देशात करोनाचे एकूण ४ कोटी ३१ लाख ९७ हजार ५२२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४ कोटी २६ लाख ४० हजार ३०१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, देशात करोनामुळे आतापर्यंत ५ लाख २४ हजार ७२३ जणांना जीव गमवावा लागला आहे.